Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे रविंद्रभैय्या, श्रीराम पाटील की चौधरी?

Jalgaon News : महायुतीतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ॲड.रविंद्रभैय्या पाटील, उद्योगपती श्रीराम पाटील की माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबतत रात्री उशीरापर्यंत पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. महायुतीतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

या पक्षातर्फे प्रथम एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली होती, परंतु तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर आता तर त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यानंतर या मतदारसंघातून रोहिणी खडसे यांचे नाव होते.

मात्र आपण विधनासभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार याची उत्सुकता वाढली होती. माजी आमदार संतोष चौधरी,रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील, मुक्ताईनगरचे मक्तेदार विनोद सोनवणे आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांचे नाव चर्चेत होते. (jalgaon political news)

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे चित्र स्पष्ट

मात्र उमेदवाराची निश्‍चिती होत नव्हती, अखेर पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज पुणे येथे मोदीबागेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, उद्योगपती श्रीराम पाटील क माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी द्यावी याबाबत चर्चा सुरू होती.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. याबाबत जिल्हाध्यक्ष ॲड.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत कोणताही निर्णय झालेला नसून अद्याप चर्चा सुरू आहे.

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन, विकास ठरतोय प्रचाराचा मुद्दा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.