Jalgaon Lok Sabha Constituency : मतदानाचा वाढीव टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार!

Lok Sabha Constituency : मतदानाची टक्केवारी सव्वा टक्क्यांनी वाढली असून मतदानाचा हा वाढीव टक्का कोणाला धक्का देऊन पराभवाच्या खाईत ढकलतो व कोणाला संसदेत पाठवतो ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
Updated on

प्रा.सी.एन. चौधरी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचोरा - भडगाव विधानसभा मतदार संघात २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सव्वा टक्क्यांनी वाढली असून मतदानाचा हा वाढीव टक्का कोणाला धक्का देऊन पराभवाच्या खाईत ढकलतो व कोणाला संसदेत पाठवतो ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले होते. या वेळी ही टक्केवारी ५९ पर्यंत गेली आहे. एक टक्क्याने मतदान वाढले असून त्यामागे महिलांचे मोठ्या संख्येने झालेले मतदान व नवमतदारांची वाढलेली संख्या हे कारण मानले जात आहे.

खासदार ठरवणारा तालुका

२०१९ च्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघातून माजी खासदार उन्मेश पाटील यांना ७६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. जळगाव लोकसभा मतदारसंघात हे मताधिक्य सर्वाधिक ठरले होते. म्हणूनच ‘खासदार ठरवणारा तालुका’ अशी या तालुक्याची ओळख कायम राहिली होती. परंतु त्यावेळी राजकीय समीकरणे व ओढाताण तसेच राजकीय पक्षातील फूट हे आताच्या २०२४ च्या राजकीय स्थिती प्रमाणे नव्हती.

त्यावेळी बलून बंधाऱ्यांसह पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांचा प्रचार व जाहीर सभांचा प्रचारासाठी वापर करण्यात आला. मोदी लाट असल्याने उन्मेश पाटील यांना एवढे मताधिक्य मिळाले होते. आताच्या २०२४ च्या निवडणुकीत मात्र राजकीय पक्षांमध्ये पडलेली फूट, वाढलेली राजकीय ओढाताण, वाढलेले आरोप- प्रत्यारोप यामुळे निवडणूक चांगलीच गाजली व गुंतागुंतीचीही झाली. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात मतदानाचा वाढलेला साडेचार टक्का कुणाला फायदा देणार?

तुल्यबळ लढत

महायुतीच्या वतीने उमेदवार स्मिता वाघ व आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात सर्वार्थाने तोडीस तोड प्रचार करण्यात आल्याने निवडणुकीचा रंग चौफेर उधळला गेला आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण तसेच महिला वर्गाचे मतदान मोठ्या संख्येने झाले असून त्यांनी कोणाला कौल दिला? हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार असले तरी २०१९ च्या निवडणुकीत जेवढे मताधिक्य उन्मेष पाटलांना मिळाले होते, तेवढे मताधिक्य आता स्मिता वाघ यांना मिळणे शक्य दिसत नाही.

शेतीविषयक मुद्दे प्रभावी

या वेळची निवडणूक मतदारांनी स्वतःच्या हातात घेतल्याचे स्पष्ट झाले. प्रचारात तसेच मतदान प्रक्रियेत तरुणांची संख्या या वेळी मोठ्या संख्येने जाणवली नाही. कापूस व सोयाबीनला असलेला अत्यल्प भाव, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव तसेच खतांच्या किंमतीत झालेली वाढ हे मुद्दे शेतकरी वर्गाने विचारात घेऊन मतदान केले. मुस्लिम समाज बांधवांच्या मतदानासाठी लागलेल्या रांगा लक्षवेधी ठरल्या.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासनाने केलेले प्रयत्न मतदानाचा टक्का वाढण्यासाठी कारणीभूत ठरले असे म्हटले जात असले तरी हे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? या संदर्भात राजकीय वर्तुळात खलबते केली जात असली तरी ते मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी व त्यांची कामे, केंद्राच्या योजना हे मुद्दे प्रभावीपणे प्रचारात न येता बलून बंधारे या जुन्या मुद्द्यासह स्थानिक मुद्द्यांवर या निवडणुकीत प्रचार करण्यात आला.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : रावेरला भावजयीविरोधात, बारामतीत नणंदेच्या प्रचारात! मुक्ताईनगरच्या लेकीचे योगदान

पक्षांमधील फोडाफोडीचे राजकारण हा विषय दोन्ही उमेदवारांच्या वतीने साधक बाधकरित्या मांडण्यात आला. या वेळी जाहीर सभांवर भर न देता मतदारांशी संपर्क, ग्रामीण भागात बैठका, कॉर्नर सभा यावर भर देण्यात आला. सोशल मीडियाचा प्रचारासाठी केलेला वापर महत्त्वपूर्ण ठरला.

मतदारांनी आपला कौल उघडपणे कळू दिला नसला तरी सत्ताधाऱ्यांसंदर्भातील नाराजी, पक्ष फोडाफोडीचे राजकारण या संदर्भात मतदारांमधून नाराजीचा सूर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. ही नाराजी मतदानातून स्पष्ट झाली की, त्याचा मतदानावर काहीच परिणाम झाला नाही हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

विजयी होणाऱ्या उमेदवारास २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे लाखाच्या आकड्यात मताधिक्य नसेल तर निवडून येणारा खासदार हजारांच्या संख्येच्या मताधिक्याने निवडून येणार हे मात्र निश्चित !

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : जिल्ह्यातील दोन्ही सोप्या लढती भाजपने केल्या कठीण; रावेर, जळगावातील स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com