Coffee with Sakal : उमेदवार म्हणून मी केवळ माध्यम, मतदार ‘मोदी पीएम मिशन’वर! रक्षा खडसे

Lok Sabha Election 2024 : दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, मतदारसंघातील कामांचा लेखाजोखा, आगामी पाच वर्षांतील ‘व्हीजन’ अशा सर्वांगीण बाबींविषयी त्यांनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद.
MP Smt. Raksha Khadse while interacting under 'Coffee with Sakal'.
MP Smt. Raksha Khadse while interacting under 'Coffee with Sakal'.esakal
Updated on

२०१४ आणि पुन्हा २०१९ ला रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर रक्षा खडसे दोन्ही वेळी तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. या वेळीही पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास दर्शवून त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली. मध्यंतरीच्या काळात त्यांचे सासरे एकनाथ खडसेंनी पक्ष बदलवत वेगळी भूमिका घेतली, तरी रक्षा खडसे एकनिष्ठ राहिल्या. या दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, मतदारसंघातील कामांचा लेखाजोखा, आगामी पाच वर्षांतील ‘व्हीजन’ अशा सर्वांगीण बाबींविषयी त्यांनी ‘सकाळ’शी साधलेला संवाद. (jalgaon lok sabha election 2024 mp Raksha Khadse)

प्रश्‍न : सलग तिसऱ्यांदा उमेदवारी कशी मिळाली, त्यामागची कारणे काय?

रक्षा खडसे : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या योजनांची मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी केली. पक्षाने वेळोवेळी दिलेले आदेश, सूचनांद्वारे संघटनात्मक कार्यातही योगदान दिले. कुठेही पक्षनिष्ठेशी प्रतारणा केली नाही. गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क, विकासकामांचा अविरत पाठपुरावा या जमेच्या बाजूंमुळे शीर्ष नेतृत्वासह राज्याचे नेते देवेंद्रजी, गिरीशभाऊ, बावनकुळे साहेब यांनी विश्‍वास दर्शविल्यानेच पुन्हा उमेदवारीची संधी मिळाली, त्याबद्दल या सर्वांची ऋणी आहे.

प्रश्‍न : यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता?

रक्षा खडसे : मुळात, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ही काही स्थानिक मुद्दे, मुलभूत सुविधांशी संबंधित नसते. ही देशाचे नेतृत्व ठरविणारी निवडणूक आहे. राष्ट्र सक्षम व कणखर नेतृत्वाकडे सोपवायचे की, अन्य कुणाकडे, याचा निर्णय देणारी ही निवडणूक आहे. उमेदवारी ही केवळ माध्यम आहे. मोदींना पंतप्रधान करणे, हे पक्ष व मतदारांचेही ‘मिशन’ आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्ष कार्यकर्ते व देशभरातील सर्वसामान्य जनताही ‘मिशन मोदी’वर निघालीय. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील व देशातील जनता सज्ज आहे.(Latest Marathi News)

MP Smt. Raksha Khadse while interacting under 'Coffee with Sakal'.
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टाळली; शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!

प्रश्‍न : व्यक्तिगत व पक्ष म्हणून या निवडणुकीसाठी आपले मुद्दे कोणते?

रक्षा खडसे : एक गोष्टी अगदी स्पष्ट आहे आणि ती म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशभरात जनकल्याणाची केलेली कामे. जनधन, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत, उज्ज्वल गॅस यासारख्या कल्याणकारी योजनांनी सामान्य माणसाचे जीवनमानच बदलून गेले आहे. याशिवाय, संपूर्ण देशात पसरत चालेले चौपदरी विस्तीर्ण महामार्गांचे जाळे, रेल्वेच्या आधुनिक सुविधांसह रेल्वेस्थानकांची सज्जता, स्टार्टअप, मुद्रा लोन अंतर्गत तरुणांना रोजगाराच्या संधी, अशा विविध कामांचा उल्लेख करावा लागेल आणि या योजनांची मतदारसंघातील प्रभावी अंमलबजावणी हे आमच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.

प्रश्‍न : मतदारसंघात आपण काय केले, याबद्दल विरोधक जाब विचारतांय?

रक्षा खडसे : मी गेल्या दहा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांसमोर आहेत. तरसोद-चिखली व पुढे खामगावपर्यंत झालेला चौपदरी रस्ता, जळगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गाचे चौपदरीकरण, बऱ्हाणपूर-रावेर-मुक्ताईनगर-बोदवड रस्ताचे रुंदीकरण, रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण, शेळगाव बॅरेजचा पूर्ण झालेला प्रकल्प, केळी फळ पीकविमा योजनेच्या लाभासाठी केलेल्या प्रयत्नांचे यश, अशा अनेक बाबी सांगता येतील. ही कामे गेल्या दहा वर्षांत झाली नाहीत, असे विरोधकांनीच सिद्ध करून दाखवावे. उलटपक्षी, प्रतिस्पर्धी उमेदवाराने तीन महिन्यांत तीन पक्ष बदलले. केवळ उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये फिरून येणे, ही कोणती वैचारिक भूमिका, कुठली पक्षनिष्ठा?

प्रश्‍न : खडसेंच्या स्नूषा म्हणून आपल्याला संधी मिळत गेली, याबद्दल काय सांगाल?

रक्षा खडसे : बाबांचा भक्कम आधार सुरवातीपासूनच आहे. मात्र, मी काही अचानक एका रात्रीतून खासदार झाली नाही. सुरवातीला ग्रामपंचायत सदस्य, नंतर जिल्हा परिषदेत सदस्य व सभापती म्हणून काम केले. २०१४ ला निर्माण झालेल्या वेगळ्या स्थितीत मला उमेदवारी मिळाली. तेव्हा आणि पुन्हा २०१९ नंतरही मी माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली. (Latest Marathi News)

MP Smt. Raksha Khadse while interacting under 'Coffee with Sakal'.
Raver Lok Sabha : रावेरमध्ये दुरंगी फाईट, भुसावळमध्ये वातावरण टाईट! महायुतीकडून विकास तर आघाडीकडून समस्यांचा मुद्दा ऐरणीवर

प्रश्‍न : निवडणूक पुन्हा जाती-पातीच्या व धर्माचा मुद्दा पुढे करून लढवली जातेय का?

रक्षा खडसे : मी तसे मानत नाही. विरोधकांना जी स्ट्रॅटेजी वापरायची, ती वापरू देत. माझ्या मते मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जाती-धर्माच्या पलीकडे ही निवडणूक होतेय. या मतदारसंघातील मतदार सुज्ञ, सुजाण आहेत. ते कधीही मतदानासाठी जात-धर्म पाहणार नाहीत, याचा विश्‍वास आहे.

बऱ्हाणपूर-तळोदा महामार्ग, मेगारिचार्ज योजना ‘लक्ष्य’

आतापर्यंत मतदारसंघातील ८० टक्के रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली. रेल्वे उड्डाणपुलांची कामेही पूर्णत्वाकडे आहेत. आता येणाऱ्या पाच वर्षांत बऱ्हाणपूर-तळोदा हा दोनशे किलोमीटरचा महामार्ग चौपदरी करण्याचा संकल्प आहे. काहीही करून हा महामार्ग रावेर शहरातूनच जाईल. या भागातील भूजल पातळी खूप खाली जाऊन भीषण स्थिती निर्माण झालीय. त्यासाठी वरदान ठरणाऱ्या मेगारिचार्ज योजनेचे काम सुरू व्हावे, हे या काळातील ‘लक्ष्य’ असेल.

बनाना क्लस्टर निर्मिती, ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस

आपल्या क्षेत्रातील केळी उत्पादकांचे बरेच प्रश्‍न, अडचणी आहेत. आपल्या भागात निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी, तसेच केळीवरील रोगांवर नियंत्रणासाठी संशोधन, बनाना क्लस्टर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येईल. आपल्या भागातून वंदे भारत एक्स्प्रेससह भुसावळ-पुणे ही नवीन गाडी नियमित स्वरूपात सुरु करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.

MP Smt. Raksha Khadse while interacting under 'Coffee with Sakal'.
Nashik Lok Sabha Election : वयोवृद्ध, दिव्यांगांचे आजपासून मतदान; नाशिक मध्य विधानसभेत 1 हजार 264 वृद्ध, 212 दिव्यांग मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.