Jalgaon Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांची जुगलबंदी! टोलेबाजीमुळे चर्चा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघांचे होम टाऊन असल्यावर देखील एका ही सभेचे आयोजन तालुक्यात झालेले नसल्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष होते.
Mahayuti
Mahayutiesakal
Updated on

अमळनेर : जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.गिरीश महाजन ,ना.गुलाबराव पाटील व ना.अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अमळनेरात महायुतीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी नेत्यांच्या भाषणातुन एकमेकांवर केलेल्या टोलेबाजीमुळे युतीचा मेळावा जास्त गाजला. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Mahayuti gathering)

शहरातील बन्सीलाल पॅलेस येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघांचे होम टाऊन असल्यावर देखील एका ही सभेचे आयोजन तालुक्यात झालेले नसल्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष होते. ना.गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील व करण पवार यांच्यावर यावेळी गंभीर आरोप केले.

मी संकटमोचक असून येणाऱ्या काळात मात्र माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावरील संकट असेल असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी ना. अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाचा मुद्दा आपल्या भाषणातून प्रखरपणे मांडला व त्यासाठी केंद्राची असणारी महत्वाची भूमिका अधोरेखित केली.

मागील चार वर्षाच्या काळात धरणाचा झालेला विकास त्यासाठी विविध विभागातून पार केलेले एक एक टप्पे याचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. धरणाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे खासदारपदी अमळनेरची व्यक्ती विराजमान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. (Latest Marathi News)

Mahayuti
Lok Sabha Election: 'त्या' रात्री PDCC बँक सुरू ठेवणं मॅनेजरला भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली मोठी अ‍ॅक्शन

स्मिता वाघांनी २०१९ ला मला आमदार होण्यासाठी मदत केली असल्यामुळे आता खासदार होण्यासाठी मी त्यांना मदत करेल असे ना. अनिल पाटील यांनी सांगितले. यामुळे मात्र व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. ना. गिरीश महाजन यांच्यासमोरच ही कबुली दिल्याने स्मिता वाघांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यामुळे मात्र व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार शिरीष चौधरी यांना आयते कोलीत मिळाले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्मिता वाघांना उघड विरोध करायला सुरुवात केलेली आहे.

ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, लोकसभेला एकत्र व्यासपीठावर असणारे विधानसभेला समोरासमोर दंड थोपटत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या राजकारणात पहायला मिळते. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी ना.महाजनांसमोर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे नेते जरी एकत्र आले तरी या मेळाव्यामुळे माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

Mahayuti
Eknath Khadse News : लोकसंपर्क अन्‌ विकासकामांची मालिका हीच ‘खडसें’ची पुंजी : एकनाथ खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.