Jalgaon Lok Sabha Election : वादाची किनार अन्‌ उमेदवारी बदलाचा ‘जळगाव’ला ‘शाप’

Jalgaon Lok Sabha Election : पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि काही ना काही वाद उद्‌भवल्याने उमेदवारी कापण्याच्या इतिहासाची जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा पुनरावृत्ती झाली.
Smita Wagh, Unmesh Patil, A.T. Patil, Vijay Naval Patil, M.K. Anna Patil
Smita Wagh, Unmesh Patil, A.T. Patil, Vijay Naval Patil, M.K. Anna Patilesakal
Updated on

सचिन जोशी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि काही ना काही वाद उद्‌भवल्याने उमेदवारी कापण्याच्या इतिहासाची जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा पुनरावृत्ती झाली. परंतु, आताच्या जळगाव व पूर्वाश्रमीच्या एरंडोल लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता याठिकाणी प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या खासदारांना तसेच पर्यायाने या मतदारसंघालाही उमेदवारी कापण्याचा ‘शाप’च लागल्याचे दिसून येते. (jalgaon lok sabha election 2024 Repetition ticket cutting controversy candidature change end political career)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर करण्यात बाजी मारत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी घोषित केली. उणीपुरी एकच टर्म झालेल्या जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामागची कारणमीमांसा सध्या सुरु आहे. मात्र, जळगाव व पूर्वाश्रमीचा एरंडोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचा सातत्याने घडणाऱ्या अशा उमेदवारी कापण्याच्या अनपेक्षित घटनांमुळे ‘शापित’ मतदारसंघ असा लौकिक झाला आहे.

विजय नवल पाटील यांचा तो किस्सा

नव्वदीच्या दशकांत तत्कालीन एरंडोल मतदारसंघात मूळ धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथील कॉंग्रेस नेते विजय नवल पाटील यांच्या बाबतीत गटबाजीतून उमेदवारी कापण्याचा किस्सा घडला. तीनदा खासदार व एकदा केंद्रात मंत्री राहिलेल्या विजय नवल पाटील यांनी १९९६ मध्ये अर्ज भरण्याची तयारी केली.

कार्यकर्त्यांसह ते नामनिर्देशनपत्र भरण्यास जायला निघाले. पण, ऐनवेळी त्यांना ‘हायकमांड’ कडून सूचना आल्या व त्यांनी नामनिर्देशनपत्र भरलेच नाही. त्यांच्याऐवजी भडगाव तालुक्यातील किशोरआप्पा पाटील यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती.

एम.के. अण्णांना झटका

मूळ चाळीसगावचे भाजपचे उमेदवार एम.के.अण्णा पाटील हेदेखील तीन टर्मच्या खासदारकीत एकदा राज्यमंत्री (ग्रामीण विकास) राहिले आहेत. २००७च्या दरम्यान त्या वेळी ‘तहलका डॉट कॉम’ या वेबसाईटने ‘ऑपरेशन दुर्योधन’अंतर्गत काही खासदारांचे स्टींग केले. त्यात एम.के. अण्णांना ‘कॅश फॉर क्वेरी’मुळे बडतर्फ करण्यात आले. (latest marathi news)

Smita Wagh, Unmesh Patil, A.T. Patil, Vijay Naval Patil, M.K. Anna Patil
Lok Sabha Poll 2024 : काँग्रेसची यादी जाहीर; सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी, भाजपचा उमेदवार कोण?

त्यांच्यासोबत जिल्ह्यातील त्यावेळच्या जळगाव मतदारसंघातील खासदार वाय.जी. महाजन यांचाही राजकीय बळी गेला. २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली आणि भाजपने अमळनेरचे आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना उमेदवारी दिली. ते निवडून येऊ शकले नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. वसंतराव मोरे (काका) निवडून आले.

ए.टी. नानांचाही राजकीय बळी

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेली पहिलीच निवडणूक होती. तेव्हा एरंडोल व जळगावऐवजी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ अशी रचना झाली. २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने, विशेषत: एकनाथ खडसे यांनी त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या पारोळ्याच्या ए. टी. पाटील (नाना) यांना भाजपमध्ये घेतले व थेट लोकसभेची उमेदवारी दिल्याने ते विजयीही झाले.

विजयाची तीच मालिका त्यांनी २०१४ लाही कायम ठेवली. मात्र, २०१९च्या निवडणुकीत हॅटट्रिक साधण्याच्या अपेक्षेत असलेल्या पाटील यांच्या खासदारकीचा व राजकीय अस्तित्वाचा पक्षांतर्गत गटबाजीने बळी घेतला. कथित क्लीपवरुन त्यांची उमेदवारी कापण्यात आली होती.

स्मिता वाघ यांचा किस्सा

ए. टी. पाटील यांना २०१९ला उमेदवारी नाकारल्यानंतर, भाजपने स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी जोरदारपणे प्रचारही सुरु केला होता. पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापून चाळीसगावचे तत्कालिन आमदार उन्मेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

Smita Wagh, Unmesh Patil, A.T. Patil, Vijay Naval Patil, M.K. Anna Patil
Nashik Lok Sabha Election : जिल्ह्याच्या विकासासाठी 17 खासदारांचेही योगदान

याच दरम्यान अमळनेर येथील एका सभेत स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ व डॉ. बी. एस. पाटील यांच्यात व्यासपीठावरच हाणामारी झाल्याची घटना मतदारसंघ विसरलेला नाही. आता २०२४ ला पुन्हा विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळेल.

अशी अपेक्षा असताना त्यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना देण्यात आली. उन्मेश पाटीलही पक्षांतर्गत गटबाजी, विशेषत: चाळीसगावमधील त्यांच्याच पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे तिकीट कापण्याचे बळी ठरले.

अशाप्रकारे तत्कालिन एरंडोल व आताच्या जळगाव लोकसभा क्षेत्राने अनेक नेत्यांना प्रस्थापित होण्यापासून तर रोखलेच, शिवाय एम.के. अण्णा, ए.टी. नानांसारख्या नेत्यांचे राजकीय बळीही घेतले आहेत. असा हा जळगाव मतदारसंघ वादाचे किस्से व पक्षांतर्गत गटबाजीच्या ‘शापा’ने ग्रासलेला आहे.

Smita Wagh, Unmesh Patil, A.T. Patil, Vijay Naval Patil, M.K. Anna Patil
Nashik Lok Sabha Election : मोदी लाटेने मोडली परंपरा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.