Jalgaon Lok Sabha Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून 2 दिवस गर्दी! 25 पर्यंतच मुदत

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी मंगळवारी (ता. २३) जळगाव व रावेर मतदारसंघांत ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी मंगळवारी (ता. २३) जळगाव व रावेर मतदारसंघांत ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. जळगावातून शिवसेना ‘उबाठा’चे उमेदवार करण पवार यांनी ‘ए’ व ‘बी’ फॉर्मशिवाय आपला अर्ज दाखल केला.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले, तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. दरम्यान, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता शेवटचे बुधवार व गुरुवार (ता.२४ व २५) असे दोनच दिवस राहिले असून, त्यासाठी या दोन्ही दिवशी उमेदवारांची गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केली आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 file application marathi news)

जळगाव लोकसभेसाठी...

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी पांडुरंग पाटील (जळगाव, अपक्ष) १, रोहन गणेश सोनवणे (अपक्ष) १, राहुल शशीकुमार सुरवाडे (जळगाव) यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी ३, नंदू श्‍यामराव पाटील (अपक्ष) १, महेश सुपडू महाजन, जळगाव (अपक्ष) १, प्रा. प्रताप मोहन कोळी (जळगाव, अपक्ष) १, संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी (जळगाव, अपक्ष) १, असे एकूण ७ उमेदवारांनी १० अर्ज घेतले.

रावेर लोकसभेसाठी...

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी युवराज देवसिंग बारेला (चोपडा, बसपा) २, जालमसिंग उत्तमसिंग वतपाळ (नांदुरा, अपक्ष) २, युनूस अब्दुल तळवी (यावल) यांनी ममता भिकारी तळवी यांच्यासाठी २, अमोल गोपाल शिरपूरकर (बोदवड, अपक्ष) २, दीपक रतिलाल चव्हाण (पाळधी) यांनी श्रीराम ओंकार पाटील (मुक्ताईनगर, अपक्ष) यांच्यासाठी ४, दीपक पद्माकर भालेराव (रावेर) यांनी संजय अर्जुन चौधरी (रावेर, अपक्ष) यांच्यासाठी ४, अविनाश विष्णू सोनवणे (जळगाव) यांनी श्रीराम सीताराम पाटील (मुक्ताईनगर, अपक्ष) यांच्यासाठी ४, योगेंद्र विठ्ठल कोलते (मलकापूर, बसपा) २, आनंद जनार्दन तेलंग (मलकापूर) यांनी अनिता योगेंद्र कोलते (मलकापूर, बसपा) यांच्यासाठी २, असे एकूण ९ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले.  (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या मनात वेगळ्या घराचा विचार : सुधाकर बडगुजर

यांचे अर्ज दाखल

जळगाव लोकसभा मतदारसंघात ललित गौरीशंकर शर्मा (जळगाव, अपक्ष) यांनी २, तर करण बाळासाहेब पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी १ अर्ज दाखल केला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार यांनी ‘अ’ आणि ‘ब’ फॉर्म सादर केलेला नाही. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ नागो साळुंखे (अपक्ष), कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील यांनी प्रत्येकी एक, तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : निवडणूक प्रशिक्षणास दांडी! जिल्ह्यात 52 निरीक्षकांना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()