Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

Jalgaon Lok Sabha Election : भाजप आणि शिवसेनेची युती असतांना गेल्या पाच पंचवार्षिकपासून जळगाव लोकसभा भारतीय जनता पक्षाकडेच आहे. या ठिकाणाहून भाजपचाच खासदार झाला आहे.
Jalgaon Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : भाजप आणि शिवसेनेची युती असतांना गेल्या पाच पंचवार्षिकपासून जळगाव लोकसभा भारतीय जनता पक्षाकडेच आहे. या ठिकाणाहून भाजपचाच खासदार झाला आहे. या मतदारसंघातील तीन ते चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे प्राबल्य होते. त्यामुळे अनेक वेळा शिवसेनेने हा मतदार संघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपने हा मतदार संघ आपल्याकडेच ठेवल्याने शिवसेनेला लोकसभेत आपली ताकद आजमाविण्याची संधी मिळाली नाही. (Jalgaon Lok Sabha Election 2024)

परंतु आता भाजपची युती तुटली आहे. परंतु, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला आता हा मतदार संघ मिळाला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट भाजपचा बालेकिल्ला फोडणार काय याकडेच लक्ष असणार आहे. जळगावात लोकसभा मतदारसंघात पूर्वी पश्‍चिम भाग होता. सन २००८ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत तो आता रावेर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे.

तर पूर्वी असलेल्या एरंडोल मतदार संघात जळगावचा सामावेश होऊन आता हा जळगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. मात्र, पुनर्रचनेअगोदर आणि नंतरही या दोन्ही मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व आहे. आताच्या जळगाव लोकसभेबाबतही तीच परिस्थिती आहे. या मतदारसंघावरही भाजपचे वर्चस्व आहे. केवळ एका पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळविला होता, तोच एकमेव अपवाद आहे.

कॉंग्रेसकडून भाजपकडे

जळगाव आणि पूर्वीचा एरंडोल मतदार संघ हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. याठिकाणाहून कॉंग्रेसने कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येत असे. सन १९५७ मध्ये कॉंग्रेसने मुंबई येथील नेते नवशेर भरूचा यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी दिली होती. त्यांचाही मोठा विजय झाला होता. कॉंग्रेसचे विजय नवल पाटील या मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून गेले आहेत. परंतु त्यानंतर भाजप-सेना युती झाल्यावर या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व निर्माण केले ते आजपर्यंत कायम आहे. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election 2024
Loksabha Election 2024 : संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

शिवसेनेची भक्कम साथ

भारतीय जनता पक्ष, शिवसेना ठाकरे पक्षाची युती असतांना शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला या मतदार संघात अगदी प्रामाणिकपणे साथ दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिकानी भाजपच्या खांद्याला खांदा लावून या मतदार संघात भाजपचा उमेदवार निवडून आणला आहे.

विधानसभेत शिवसेना पण..

लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेच्या आगोदर व नंतरही या लोकसभा मतदारसंघातील पारोळा,जळगाव ग्रामीण, पाचोरा, व जळगाव, चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु लोकसभेत नेहमी शिवसेनेने भाजपच्या उमेदावारालाच विजयासाठी साथ दिल्याचे दिसून आले.

शिवसेनेचा लोकसभेसाठी प्रयत्न

शिवसेनेने जळगाव लोकसभेसाठी प्रयत्न केले होते. प्रत्येक निवडणूकीत त्यांनी मागणी केली होती. परंतु युतीत वरीष्ठांच्या निर्णयात भारतीय जनता पक्षाच्या वाट्यालाच हा मतदार संघ गेला होता. पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार (कै.) आर.ओ.तात्या पाटील यांनी सन २०१४ मध्ये या मतदार संघातून शिवसेनेतर्फे लढण्याची तयारी केली होती. हा मतदार संघ युतीत शिवसेनेकडे घ्यावा यासाठी त्यांनी वरिष्ठांना गळ घातली होती. आपण कसे निवडून येणार याचा आराखडाच त्यांनी सादर करीत जातीय गणितावरही मात केल्याचे दाखविले होते. मात्र दुर्दैवाने लोकसभा निवडणूक येण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. त्यामुळे शिवसेनेकडे हा मतदारसंघ येण्याच्या प्रयत्नाला खिळ बसली.

Jalgaon Lok Sabha Election 2024
Latur loksabha Constituency : नवख्या उमेदवारावर काँग्रेसकडून डाव

शिवसेना ठाकरे गटाकडे मतदार संघ

भाजपसोबत असताना शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला नाही. परंतु आता युती तुटली आहे. हा पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत आहे. आता हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मशालीची लढत भाजपच्या कमळासोबत होणार आहे. भाजपच्या या बालेकिल्यात माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला प्रथमच हा मतदार संघ मिळाला आहे. पक्ष फुटण्याअगोदर जळगाव ग्रामीण, पारोळा व पाचोरा या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. आजही या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे. शिवाय, जळगाव मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे.

मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचा अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे. भाजपचा बालेकिल्ला फोडण्यासाठी शिवसेना चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, अमळनेर येथील ललिता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु बाहेरच्याला उमेदवारी देऊन तगडे आव्हान निर्माण करून भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न राहणार आहे. ते त्यात यशस्वी होतात काय याकडेच आता लक्ष असणार आहे.

Jalgaon Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha Code Of Conduct : जिल्ह्यात 51 हजारांवर फलक, झेंडे हटविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.