Jalgaon Lok Sabha Election 2024: मध्यांतराच्या 4 तासांतील मतदान ठरणार निर्णायक! भर दुपारी उन्हाच्या तीव्रतेत 25 टक्क्यांची भर

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाला मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून विविध कार्यक्रम घ्यावे लागतात व उपक्रमही राबवावे लागतात.
voting
votingesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव व रावेर मतदारसंघातील मतदान होऊन आठवडा झाला. मतदानोत्तर विविध राजकीय पदाधिकारी, विश्‍लेषकांकडून वेगवेगळ्या स्वरूपाची गणितं मांडली जाताय, पण यंदा मतदान प्रक्रियेत भर दुपारी, तापमानाने चाळिशी पार केलेली असताना, ११ ते ३ या चार तासांत दोन्ही मतदारसंघांत झालेले २५ टक्क्यांहून अधिक मतदान निर्णायक ठरणार आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Voting in 4 hours will define)

एरवी विधानसभा, पालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मतदारांमधील उत्साह, मतदान केंद्रांवरील रांगा लोकसभा निवडणुकीत अभावानेच दिसून येतात. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत मतदारांमध्ये उदासीनता असते. त्यामुळेच निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाला मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून विविध कार्यक्रम घ्यावे लागतात व उपक्रमही राबवावे लागतात. त्या अन्वये जिल्हा प्रशासनाने जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले.

मतदानाचा टक्का वाढला

जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत काही प्रमाणात का होईना, मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. विशेषत: शहरी भागातील नागरिक मतदानाबाबत उदासीन असतात. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातूनही बऱ्यापैकी मतदान झाल्याचे दिसून आले. अर्थात ग्रामीण भागाच्या शहरी भागातील मतदान तुलनेने कमीच नोंदवले गेले.

उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम

आपल्याकडे दोन्ही मतदारसंघांत सोमवारी (ता. १३) शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले. लोकसभा निवडणूक साधारण एप्रिल- मे महिन्यातच होते. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेचाही मतदानावर परिणाम होतो. अन्य मतदारसंघांमध्ये तो प्रकर्षाने जाणवला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगासह पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनीही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

उन्हाच्या तीव्रतेतही मतदान

जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. तापमान मे महिन्यात ४२ ते ४३ अंशांवर पोहोचते. त्यामुळे १३ मेस तापमानाच्या तीव्रतेने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, मतदारांनी ती शक्यता फोल ठरविली. एक तर त्या दिवशी रावेर परिसरात काही ठिकाणी पाऊस झाल्याने तापमानाचा पारा घसरला. तरीही दुपारी तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक होते. तरीही मतदारांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये उत्स्फूर्तपणे मतदान केले. (latest marathi news)

voting
Jalgaon Urja Chat Bot: वीजबिल जास्त येतेय, घरबसल्या ॲपवर करा तक्रार! वीज कंपनीची नवीन सुविधा; ग्राहकांची वेळ अन पैसे वाचणार

दुपारी अधिक मतदान

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व निवडणूक अधिकारी मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी जाहीर करीत असतात. लोकसभा निवडणुकीसाठी १३ मेस सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान झाले.

उन्हाच्या तीव्रतेने सकाळी व सायंकाळी मतदानाचे प्रमाण जास्त राहील, असे वाटले होते. प्रत्यक्षात सकाळी व सायंकाळी दोन तासांत मतदानाची टक्केवारी कमी राहिली आणि ऐन दुपारी उन्हावेळी म्हणजे दुपारी ११ ते ३ या वेळेत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले.

असे झाले मतदान

पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी ७ ते ९ या वेळेत जळगाव मतदारसंघात ६.१४ टक्के, तर रावेरमध्ये ७.१४ टक्के मतदान झाले. ९ ते ११ या वेळेत जळगावात १०.७५ व रावेर मतदारसंघात ११.८९ टक्के मतदान झाले. दुपारी ११ ते १ यादरम्यान जळगावात तब्बल १४.८१ व रावेरमध्ये १२.९९ आणि १ ते ३ या वेळेत जळगावात १०.४५ व रावेर मतदारसंघात १३.२४ टक्के मतदान झाले आहे.

म्हणजे दुपारी ११ ते ३ या भर उन्हाच्या चार तासांमध्ये या दोन्ही मतदारसंघांतील मतदानात तब्बल २५ टक्के भर पडल्याचे दिसून येते आणि या दोन्ही मतदारसंघांतील हे चार तासांतील २५ टक्के मतदान निर्णायक ठरणार आहे. त्या तुलनेत सकाळी मतदान ६ ते ७ टक्केच होते, तर अखेरच्या टप्प्यात दुपारी ३ ते ६ या तीन तासांतही जळगावात १६ टक्के, तर रावेर मतदारसंघात १९ टक्के मतदान झाले.

भर दुपारी केंद्रांवर रांगांचे दृष्य

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भर दुपारी, उन्हाच्या तीव्रतेत मतदान केंद्रांवर शुकशुकाट असल्याचे दृश्‍य सामान्य असते. मात्र, यंदा दुपारीही जळगाव शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दृश्‍य दिसून आले. विशेष म्हणजे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विनंतीशिवाय मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसले.

असे झाले मतदान (टक्के)

वेळेचा टप्पा---७ ते ९--९ ते ११---११ ते १--१ते ३--३ ते ५-- ५ ते ६--- एकूण

जळगाव -----६.१४---१०.७५---१४.८१---१०.४५--९.८३---६.४९--- ५८.४७

रावेर-------७.१४----११.८९---१२.९९---१३.२४---१०.१---८.९२----६४.२८

voting
Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.