Jalgaon Lok Sabha Election 2024: मोंदीच्या सभेशिवाय BJP जळगाव, रावेरमध्ये आजमावतेय नशीब! गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची परीक्षा

Lok Sabha Election 2024 : सभेशिवाय भाजपला यश मिळाल्यास ते स्थानिक नेत्यांच्या बळावर असणार असून मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा त्यावर वरचष्मा असणार आहे
Girish Mahajan & Modi
Girish Mahajan & Modiesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २५ सभा घेतल्या तसेच मुंबईत ‘रोड शो’ केला. मात्र जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात यावेळी त्यांची सभा झालेली नाही. त्यांच्या सभेशिवाय भाजपला यश मिळाल्यास ते स्थानिक नेत्यांच्या बळावर असणार असून मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा त्यावर वरचष्मा असणार आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 test of Girish Mahajan leadership)

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष महायुतीच्या स्मिता वाघ विरूद्ध शिवसेना (उबाठा) पक्ष महाविकास आघाडीचे करण पवार तर रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष महायुतीच्या रक्षा खडसे विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात खऱ्या अर्थाने लढत झाली आहे. दोन्ही मतदारसंघात लढत अत्यंत काट्याची झाल्याचे दिसून येत असून कोण विजयी होणार यावर आराखडे बांधणे सुरू आहे.

दोन्ही मतदारसंघात भाजप तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली.

रावेर मतदारसंघात भाजपतर्फे फडणवीस व गडकरी यांच्या सभा झाल्या तर विरोधी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा झाल्या. या शिवाय दोन्ही पक्षातर्फे जिल्ह्यातील नेत्यांच्याही सभा झाल्या आहेत. (latest marathi news)

Girish Mahajan & Modi
Nashik Lok Sabha Constituency : ‘भटकती आत्मा’, ‘नकली संतान’ ते ‘चोरांचे सरदार’व्हाया ‘टरबूज’! व्यक्तिगत टीका-टिपण्णीचा स्तर घसरला

प्रथमच मोदींची सभा नाही

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०२९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. त्यांच्या या सभांमुळे मतदारांमध्ये वातावरण निर्माण झाले होते व उमेदवारांमध्ये विजयाचा आत्मविश्‍वासही निर्माण झाला होता.

मात्र या निवडणूकीत पक्षाने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मोदी यांची सभा दिली नाही. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या पंचवीस वर्षापासून दोन्ही मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येत असल्यामुळे त्याच आधारावर भाजपने यावेळी मोदी यांची सभा जिल्ह्यात घेतली नसल्याचा अंदाज आहे.

सभा न होताही विजयाची आशा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघात झालेली नसली तरी दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना विजयाची आशा आहे. राज्यातील व जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी स्वत:च्या बळावर हे दोन्ही मतदार संघ लढविले आहेत.

राज्यात भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी नरेंद्र मोदी यांच्या विक्रमी सभा झाल्या मात्र जळगाव व रावेर मतदारसंघासाठी सभा न झाल्यामुळे दोन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाल्यास जिल्ह्यातील नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा नेतृत्वाचा वरचष्मा राहणार आहे.

Girish Mahajan & Modi
Dindori Lok Sabha Constituency : कांदामय निवडणूकीचा कौल अधांतरी; 75 टक्के मतदान कोणाच्या पथ्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.