Jalgaon News : जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील ५० हजार ४११ मतदार आहेत. तीन लाख ३० हजार मतदार पहिल्यादांच मतदान करणार आहेत. जिल्ह्यात ३५ लाख २७ हजार ९२९ मतदार आहेत. त्यात १८ लाख २८ हजार ५२० पुरुष, तर १६ लाख ९९ हजार २७७ महिला मतदार आहेत. तृतीयपंथीय १३२ आहेत. महिला मतदारांची नोंदणी पुरुषांपेक्षा २५ टक्के अधिक झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon Lok Sabha Election 3 lakh 30 thousand voters will vote first)
योग्य कारणांमुळे सूट मिळणार
कारणे योग्य असलेल्या निवडणूक ड्यूटीतून कर्मचाऱ्यांना सूट दिली जाणार आहे. गरोदर महिला कर्मचारी, अपंग, पक्षाचे पदाधिकारी, आजारी अशांना सूट मिळेल. मात्र, त्यासाठी कागदपत्रे सखोल तपासले जातील. २० हजारांवर कर्मचाऱ्यांना सात मुद्दयांवर निवडणुकीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांची आनलाईन परीक्षा घेतली. त्यात ६४ टक्के कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण उत्तीर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रशिक्षित केले जाईल.
तीन संवेदनशील मतदान केंद्रे
जिल्ह्यात २०१९ मध्ये ३६ मतदान केंद्र संवेदनशील होती. त्यावर पोलिस, महसूल विभागाने कार्य करून संवेदनशील मतदार केंद्राच्या संख्येत घट झाली असून, आता केवळ तीन मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
क्यूआर कोडला प्रतिसाद
जिल्ह्यातीू नगरपालिका क्षेत्रात क्यूआर कोड लावले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २५ हजार मतदारांनी कोड स्कॅन करून आपले मतदान केंद्र व नाव शोधले आहे. (latest marathi news)
१,७९३ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग
जिल्ह्यात १,७९३ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे. मतदार केंद्रात गर्दी, गोंधळ झाला, तरी ते दिसणार आहे. ते दिसताच पोलिस त्याठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणतील.
१,५९३ वाहनांची गरज
सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्रे, कर्मचारी ने- आण करण्यासाठी १,५९३ वाहनाची गरज आहे. त्यात बस, क्रूझर, जीप, स्कूल बस आदींचा समावेश आहे.
अर्ज भरण्याची तयारी पूर्ण
अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू होईल. त्यासाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहेत. उमेदवाराने अगोदर येऊन अर्ज घ्यावा, डिपाझीट भरावे. सर्वसामान्य उमेदवारासाठी २५ हजार, तर एससी, एसटी उमेदवारासाठी १२ हजार ५०० रोख भरावे लागतील.
चेक, चिल्लर, फॉरेन क्रन्सी चालणार नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा कक्ष जळगाव लोकसभेच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या कक्षात रावेर लोकसभेच्या उमेदवारांना अर्ज भरता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.