Jalgaon Lok Sabha Election : नणंदेच्या भावजयीला शुभेच्छा! ॲड. रोहिणी खडसे- रक्षा खडसे यांची कोथळीच्या मतदान केंद्रावर भेट

Lok Sabha Election : ॲड. रोहिणी खडसे यांनी स्वत:हून पुढे येत गाडीत असलेल्या रक्षा खडसे यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
While congratulating BJP candidate Raksha Khadse sitting in the car outside the polling station, Adv. Rohini Khadse-Khewalkar.
While congratulating BJP candidate Raksha Khadse sitting in the car outside the polling station, Adv. Rohini Khadse-Khewalkar.esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : मुक्ताईनगरातील कोथळी येथील केंद्रावर मतदानाला जाताना भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिण खडसे-खेवलकर यांची भेट झाली. सोमवारी (ता. १३) रक्षा खडसे यांचा वाढदिवस होता. ॲड. रोहिणी खडसे यांनी स्वत:हून पुढे येत गाडीत असलेल्या रक्षा खडसे यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. (Adv Meeting of Rohini Khadse Raksha Khadse and Kothali polling station )

रावेर मतदारसंघात भाजप-महायुतीच्या उमेदवार म्हणून रक्षा खडसे रिंगणात आहेत, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा ॲड. रोहिणी खडसे यांनी सांभाळली. कुटुंबात रक्षा व रोहिणी यांचे भावजयी-नणंदेचे नाते असले, तरी पक्ष भिन्न असल्याने दोघांच्या भूमिकेबद्दल नेहमीच राजकीय वर्तुळात उत्सुकता लागलेली असते. लोकसभेच्या प्रचारादरम्यान सुनेसाठी स्वत: एकनाथ खडसे प्रचारात उतरले होते, तर ॲड. रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांच्याविरोधात त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला. (latest marathi news)

While congratulating BJP candidate Raksha Khadse sitting in the car outside the polling station, Adv. Rohini Khadse-Khewalkar.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! जळगाव, रावेरसाठी सोमवारी मतदान

अन्‌ रक्षाताईंना दिल्या शुभेच्छा

कुटुंबातील सदस्यांमधील या राजकीय भिन्नतेत कोथळी येथील केंद्राजवळ रक्षा खडसे व रोहिणी खडसे यांची भेट झाली. रोहिणी खडसे मतदानासाठी जात असताना, रक्षा खडसे यांची गाडी आल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. रोहिणी खडसे यांनी थांबून स्वत: गाडीजवळ जात रक्षा खडसे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा वाढदिवस असल्याने शुभेच्छा दिल्याचे रोहिणी खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हातात हात घेऊन त्यांनी निवडणुकीतील विजयाबद्दलही ‘ऑल दी बेस्ट’ केल्याची चर्चाही या वेळी रंगली होती.

While congratulating BJP candidate Raksha Khadse sitting in the car outside the polling station, Adv. Rohini Khadse-Khewalkar.
Jalgaon Lok Sabha Election : मोदी... विकासाचे गुजरात पॅटर्न, विकसित भारत अन्‌ सुरेशदादांची भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.