जामनेर : भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते सततच विविध कार्यक्रमांद्वारा सक्रीय राहुन पक्षाच्या संघटन वाढीसाठी प्रयत्नशिल असताना दिसुन येतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते मात्र फक्त निवडणुका जवळ आल्या तरच हालचालींना सुरुवात करतात, असाच काहीसा प्रकार लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यावर दिसुन येत आहे. (Jalgaon Lok Sabha Election)
रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदान महिना-दीड महीना लांब असले तरी भारतीय जनता पक्षातर्फे संपुर्ण जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये गटवार बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क सुरुही झाला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश बैठकांना स्वतः मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती लाभते.
माजी नगराध्यक्षा साधना महाजन शिवाय भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार रक्षा खडसेही नेते-कार्यकर्ते आदींशी संवाद साधताना दिसत आहेत. शिवाय पक्षाच्या जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांचीही मांदियाळी बघायला मिळते. दुसरीकडे मात्र रावेरमधील महाविकास आघाडीचा अजुनही उमेदवार निश्चित झालेला नाही. (latest marathi news)
नेते-कार्यकर्ते सैर-भैर झाल्याचे दिसते. शिवाय आघाडीतील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला रावेरचा मतदारसंघ येतो, याबाबतही आतापर्यंत तरी संदिग्धता कायम आहे. मध्यंतरी ॲड. रवींद्र पाटील, संतोष चौधरींच्या नावांची वेगवेगळ्या ठिकाणी घोषणा झाली होती पण अजुनही कुठल्याही पक्षाने अधिकृत घोषणा केलेली दिसत नाही.
या विविध राजकीय घटनांमुळे सध्या तरी जामनेर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुक तयारीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या राजकीय पटलावर सर्वदुर शांतताच दिसून येत असल्याचे चित्र आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.