Jalgaon Lok Sabha Election : यावल तालुक्यात 68.28 टक्के चिठ्ठ्यांचे वितरण; मतदान करण्यासाठी सुविधा

Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पुर्वी बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून तालुक्यातील दोन लाख १० हजार ५५६ मतदारांना घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठीचे वितरण केले जात आहे. तालुक्यातील ८७पैकी २९ गावांत १०० टक्के मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठ्या पोहोचविण्यात आल्या आहेत. ( Distribution of 68 percent lots in Yaval taluka )

उवर्रित मतदारांपर्यंत येत्या पाच दिवसांत मतदान चिठ्ठ्या पोहोचतील, अशी ग्वाही तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली. यावल शहरासह तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक तहसीलदार रशीद तडवी, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी वितरणच्या कामाला वेगाने सुरवात झालेली आहे.

तालुक्यातील एकूण ८७पैकी २९ गावांतील मतदारांच्या हातात मतदान चिठ्ठी देण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण मतदान चिठ्ठी वितरणाचे काम हे ६८.२८ टक्के झाले आहे. येत्या पाच दिवसांत तालुक्यातील रावेर व चोपडा विधानसभा मतदारसंघात असलेल्या एकूण दोन लाख १० हजार ५५६ मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठी पोहोचविण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : उमेदवारी अर्ज स्वीकारताना राबविली चारस्तरीय पद्धत!

शहरात व ग्रामीण भागात प्रत्येक प्रभागात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचा शोध घेऊन घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठी वाटप करीत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृती, त्याचप्रमाणे मतदारांपर्यंत वोटर चिट्ठी पोहोचवून त्यांनी लोकशाहीच्या या महामेळाव्यात आपले मत देऊन लोकशाही बळकट करावी, असे आवाहनदेखील केले जात आहे.

असे झाले वितरण

यावल तालुक्यात रावेर विधानसभा क्षेत्रात ६९ गावांत १४४ मतदान केंद्र असून, येथे एक लाख ४२ हजार २३३ मतदार आहेत, तर चोपडा विधानसभा क्षेत्रात ४८ गावांतील ६७ मतदान केंद्रांत एकूण ६८ हजार ३२३ मतदार असे एकूण यावल तालुक्यात २११ मतदान केंद्रांत दोन लाख १० हजार ५५६ मतदारांपैकी एक लाख ३९ हजार ५६० मतदारांना वोटर चिठ्ठी वितरण झाली आहे.

या गावांत १०० टक्के वितरण

यावल तालुक्यातील न्हावी, डोंगरकठोरा, चारमळी, सातोद, हंबर्डी, सांगवी खुर्द, पिंप्री, करंजी, रिधुरी, वनोली, कोसगाव, भोरटेक, पिळोदा बुद्रुक, पिळोदा खुर्द, अंजाळे, लंगडा आंबा, थोरगव्हाण, मनवेल, उसमळी, गाड्ऱ्या, जामन्या, रूईखेडा, वाघझिरा, सावखेडासिम, कोळन्हावी, शिरसाड, नावरे, वढोदे, डोेणगाव या २९ गावांत १०० टक्के मतदान चिठ्ठी वितरण झाले आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : तावडे, बावनकुळेंच्या सूचनेनुसार प्रचारात; सून रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.