Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदार संघातून मला शिवसेना ठाकरे गटाकडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट, कॉंग्रेस तसेच मित्र पक्ष, तरुण वर्ग आणि भाजपतील नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मला पाठिंबा आहे. भाजपने कार्यकर्त्यांची मते डावलून उमेदवारी जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. असे मत जळगाव लोकसभेचे उमेदवार ‘करण पवार’यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Jalgaon Lok Sabha Election)
मुंबई येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार उन्मेष पाटील व इतर कार्यकर्त्यानी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण पवार यांची उमेदवारी जाहिर केली.
यानंतर करण पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून माझ्यासारख्या युवकाला संधी दिली आहे. त्या संधीचे सोने आपण करणार आहोत, या मतदार संघातून विजयी होवू अशी आशा असून मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. (latest marathi news)
भाजपची उमेदवारी मत डावलून
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, की खासदार उन्मेष पाटील यांनी मतदार संघात चांगले काम केले होते, त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्याचे मत होते, मात्र कार्यकर्त्यांची मत डावलून पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिली त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
पदासाठी नव्हे मित्रासाठी प्रवेश
खासदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी रद्द करून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांनीही आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे,मात्र हा प्रवेश त्यांनी कोणत्याही पदासाठी केलेला नाही, तर शिवसेना ठाकरे गटात स्वाभिमानाने काम करण्यासाठी आणि मैत्रीसाठी केला आहे. त्यांनी माझ्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ते शिवसेना पक्षाचे मोठ्या उमेदीने कार्य करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.