Jalgaon Lok Sabha Election : एरंडोलमध्ये राजकीय वर्तुळात पक्षांतरावरच अधिक चर्चा

Jalgaon News : महायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांचे जुने व्हिडीओ व भाषण व्हायरल करीत आहेत.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Electionesakal
Updated on

एरंडोल : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर देखील राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये शांतता दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांचे जुने व्हिडीओ व भाषण व्हायरल करीत आहेत. (Jalgaon Lok Sabha Election)

उन्मेष पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना तालुक्यात केवळ माजी खासदार उन्मेष पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या पक्षांतराबाबतच मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपच्या माजी आमदार स्मिताताई वाघ यांची तर महाविकास आघाडीच्यावतीने नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या श्रीमती स्मिताताई वाघ यांनी शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे.

करण पवार यांची उमेदवारी नुकतीच जाहीर झालेली असल्यामुळे त्यांनी अद्यापपर्यंत प्रचारास सुरुवात केलेली नाही. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना तालुक्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्ंयामध्ये मात्र शांतता दिसून येत आहे. उन्मेष पाटील आणि करण पवार यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. (jalgaon political news)

Jalgaon Lok Sabha Election
Baramati Loksabha: बारामती जिंकण्यासाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! थेट सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांनाच गाठलं

शहरासह ग्रामीण भागात भाजप, शिवसेना ठाकरे गट व शिंदे यांचे संघटन मजबूत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कोणता पदाधिकारी कोणत्या गटात आहे हेच कळत नसल्याने संघटना खिळखिळे झाले आहे. कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य असून पक्षाचे ठराविक पदाधिकारी कार्यक्रमांचे आयोजन करून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भाजपचे संघटन मजबूत असले तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट असून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहत असल्यामुळे मतभेद मिटविण्याचे आव्हान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उभे राहिले आहे. तालुक्यातील भाजपाचे बहुतांश विद्यमान पदाधिकारी उन्मेष पाटील आणि करण पवार यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या उपस्थितीतच कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते, मात्र त्यांनी पक्षांतर करून सर्व पदाधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले असल्याची संतप्त प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांत व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Lok Sabha Election
Sangli Loksabha Constituency : ‘सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही’ ;विशाल पाटील यांच्यासाठी राज्यसभेचा प्रस्ताव

भाजपतर्फे उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापण्यात आल्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सोशल मिडियावर त्यांच्या भूमिकेचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून समर्थन केले जात आहे तर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून टीका केली जात आहे. उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून पक्षांतर केल्याचे उन्मेष पाटील सांगत असल्यामुळे महायुतीचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार स्मिताताई वाघ यांची उमेदवारी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती, मात्र अचानक पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी स्मिताताई वाघ यांनी पक्षाचा आदेश मानून उन्मेष पाटील यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला.

तसेच उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर देखील माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी कोणतीही नाराजी न दाखवता पक्षाचा आदेश मानून पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता अशा प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांत व्यक्त केल्या जात आहेत.

Jalgaon Lok Sabha Election
Loksabha Election 2024 : मतदानासाठी शाईचा महापुरवठा ; ‘म्हैसूर पेंट्स व व्हार्निश’ कंपनीला काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.