जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. असे असले तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया बरोबर महिन्यानंतर म्हणजेच १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघे आठ दिवस म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ दिला जाईल. २६ एप्रिलला छाननी तर २९ एप्रिलला माघारी होईल. माघारीनंतर अवघे तेरा दिवस प्रचाराला मिळणार आहेत. (Jalgaon Lok Sabha Election process from April 18)
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ ११ विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण ३५८२ मतदान केंद्र येतात. तर उर्वरित १ विधानसभा मतदारसंघात- मलकापूर (जि. बुलढाणा) येथील एकूण ३०४ मतदान केंद्र - रावेर सभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. असे एकूण ३८८६ मतदान केंद्र आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना अशी घ्यावी लागेल काळजी..
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहित नमुना " २अ" भरावा लागेल. उमेदवारास शपथ/दृढकथन करावे लागेल. शपथपत्र नमुना -२६. (प्रथम वर्ग दंडाधिकारी / नोटरी / ओथ कमिशनर यांचे समक्ष स्वाक्षरी करून सादर करावे लागेल. (latest marathi news)
मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र, मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबतचे उमेदवाराचे लेखी पत्र, उमेदवारी अर्जासोबत जमा करावयाची अनामत रक्कम पंचवीस हजार रुपये, उमदेवार अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवार असेल तर १२ हजार ५०० भरावे लागतील. एक उमेदवार जास्तीत जास्त ४ उमेदवारी अर्ज सादर करू शकेल. तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही.
उमेदवार मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक, तर अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष व अपक्ष असल्यास एकूण १० सूचक आवश्यक लागतील. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचना पत्र (नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी ३ पूर्वी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.