Jalgaon Lok Sabha Election : किसान महाविद्यालयातील ‘रासेयो’ची प्रशासनाला मदत; विद्यार्थ्यांचा पुढाकार

Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) मतदान पार पडले. यावेळी एरंडोल-पारोळा मतदारसंघात एकूण ११ आदर्श केंद्र तयार करण्यात आलेली होती.
Students of 'Raseyo' of Kisan College taking the differently abled to vote.
Students of 'Raseyo' of Kisan College taking the differently abled to vote.esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) मतदान पार पडले. यावेळी एरंडोल-पारोळा मतदारसंघात एकूण ११ आदर्श केंद्र तयार करण्यात आलेली होती. त्यापैकी दिव्यांग संचालित मतदान केंद्र व महिला संचालित पिंक केंद्र पारोळामध्ये उभारण्यात आलेले होते. दिव्यांग संचालित मतदान केंद्र हे साने गुरुजी कॉलनीतील सानेगुरुजी शाळेत उभारण्यात आले होते. ( Raseyo in Kisan College helps administration from student )

या ठिकाणी हे दिव्यांग संचालित केंद्र सुशोभीकरणासाठी किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रशासनाला सहकार्य केले. मतदान करण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ, दिव्यांग व आजारी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठीसुद्धा या विद्यार्थ्यांनी मदत केली. सकाळी सहापासूनच किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दिव्यांग मतदान केंद्राची व परिसराची स्वच्छता केली.

शिवाय आजूबाजूचा परिसर रांगोळी टाकून सुंदर केला. यावेळी डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी तयार केलेला दिव्यांग तरुणाचा पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरले होते. मतदान केल्यानंतर प्रत्येकाने या दिव्यांग पुतळ्यासमोर आपला सेल्फी काढला. मतदान केंद्रावर खुर्च्यांची व पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली होती. त्यामुळे उभे राहून थकल्यानंतर थोडा वेळ विश्रांतीसुद्धा अनेकांनी घेतली. (latest marathi news)

Students of 'Raseyo' of Kisan College taking the differently abled to vote.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांची जुगलबंदी! टोलेबाजीमुळे चर्चा

या केंद्रामध्ये दिव्यांगांनी केलेल्या कार्यकर्तुत्वाचा चित्र देखावा साकारलेला होता. या मतदान केंद्राविषयी अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अनेक मतदार दुसऱ्या मतदान केंद्रावरून हे मतदान केंद्र पाहण्यासाठी आलेले होते. अशा पद्धतीचे मतदान केंद्र असतील, तर अनेकांना मतदान करण्याची इच्छा होईल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. हे मतदान केंद्र तयार करण्यासाठी प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, पारोळा येथील तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर, किसान महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. चंद्रकांत सातपुते, मतदान कार्यालय कर्मचारी अनिल परदेशी, अंकित साळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अविनाश राठोड, सत्यम पाटील, रितिका सोमवंशी, चेतनश्री महाजन, समाधान राठोड, गोरख चव्हाण, राहुल वंजारी या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शेळावे, टोळी, लोणी, रत्नापिंप्री येथेसुद्धा मतदान करण्यासाठी मतदारांना सहकार्य केले.

Students of 'Raseyo' of Kisan College taking the differently abled to vote.
Jalgaon Lok Sabha Election : शहरात लोकशाहीच्या उत्सवाचा उत्साह! सकाळपासूनच मतदानासाठी रांगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.