Jalgaon Lok Sabha Election : महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे आला आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आम्हाला हा मतदार संघ मिळाल्यामुळे आम्ही तो जिंकणारच आहोत. सर्वसामान्य कार्यकर्ता आमचा उमेदवार असेल. आम्ही ज्यावेळी उमेदवार घोषित करू, त्यावेळी भाजप घोषित केलेला उमेदवार बदलण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यावर आता पुन्हा दुसऱ्यांदा बदलाची वेळ येऊ नये, त्यांना रिंगणात लढू द्यावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. (Jalgaon Lok Sabha Election Sanjay Sawant statement Ordinary worker Shiv Sena Thackeray group candidate)
जळगाव लोकसभा मतदार संघ महायुतीत भारतीय जनता पक्षाकडे तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. भाजपने माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव जिल्ह्यात आहेत.
तीन दिवसांपासून त्यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या भेटी घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केल्या आहेत. तसेच मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी आघाडीतील पक्षाच्या व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. शनिवारी त्यांनी अंतिम बैठक पारोळा येथे घेतली.
जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलतांना सावंत म्हणाले की, आमच्याकडे हा मतदारसंघ आला असून आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या साथीने पूर्ण ताकदीने या मतदारसंघात लढत देणार आहोत. (latest marathi news)
त्यात आमचा विजय निश्चित असणार आहे. आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कार्यकर्ताच असणार आहे. पक्षाचे नेतृत्व आणि चिन्ह हेच आमचे खऱ्या अर्थाने उमेदवार असणार आहे. मतदारसंघातील लढाई खऱ्या अर्थाने मोदीविरूद्ध उद्धव ठाकरे अशीच होणार आहे.
त्यांनी उमेदवार बदलू नये
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी उमेदवार बदलला होता.आमच्याकडे तब्बल चार उमेदवार इच्छुक आहेत. आपण मतदारसंघातील सर्व तालुके फिरून उमेदवारांबाबत अहवाल तयार केला आहे. तो आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहोत. त्यानंतर ते उमेदवारी जाहीर करतील.
मात्र आमचा उमेदवार सामान्य कार्यकर्ता असेल, त्याची घोषणा झाल्यानंतर मात्र भाजपने आपला उमेदवार बदलाचा विचार करू नये, अन्यथा त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी दुसऱ्यांदा रद्द होण्याची वेळ येईल. त्यांच्यावर अशी वेळ न आणता त्यांना रिंगणातच लढू द्यावे असे अवाहनही सावंत यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.