Jalgaon Lok Sabha Election : ‘रावेर’मध्ये शरद पवार गटाकडून अमोल जावळेंच्या नावाचा विचार

Jalgaon News : रक्षा खडसे यांना उमेदवारी कायम केल्यानंतर नाराज झालेल्या जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
Amol Javale
Amol Javale esakal
Updated on

Jalgaon News : भाजपने रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी कायम केल्यानंतर नाराज झालेल्या जिल्हाध्यक्ष अमोल जावळेंना आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्वत: सुप्रिया सुळे व रोहित पवार त्यासाठी जावळेंच्या संपर्कात असून, त्यामुळेच शरद पवार गटाचा रावेरचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, असे सांगितले जात आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

रावेर मतदारसंघातून भाजपने सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत लढण्यास नकार दिला. पाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनीही त्या विधानसभेची तयारी करीत असल्याचे सांगत असमर्थता दर्शविली.

त्यामुळे रावेरमधून नेमके कुणाला मैदानात उतरवायचे, असा प्रश्‍न शरद पवार गटासमोर आजही कायम आहे. राज्यातील अन्य महत्त्वपूर्ण मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर होत असताना, रावेरमधील सक्षम उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही.

या नावांचा झाला विचार

खडसे पिता-पुत्रीच्या नकारानंतर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर विनोद सोनवणे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, या कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातून उद्योजक श्रीराम पाटील यांचेही नाव समोर आले. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. (jalgaon political news)

Amol Javale
Akola loksabha constituency : काँग्रेसमुळे आंबेडकरांचे ‘टेन्शन’ वाढले

जातीय समीकरणावर मंथन

रावेर लोकसभा मतदारसंघ जातीय समीकरणात लेवा बहुल असल्याने व त्या समाजाचा एकमेव प्रतिनिधी राज्यात खासदार म्हणून निवडून जात असल्यामुळे पक्षातर्फे त्या समाजाचा उमेदवार देण्यावरच प्राधान्य दिले जाते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातर्फे अशाच उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यामुळेच पक्षातर्फे मतदारसंघात उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास विलंब होत आहे.

पवार- जावळेंचे संबंध

त्यातूनच भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेले भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. (कै.) हरिभाऊ जावळे खासदार असताना, शरद पवार व त्यांची मैत्री होती. जावळे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना, व शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना, साखर कारखान्याच्या कार्यक्रमास ते फैजपूरला आले होते.

त्यावेळी त्यांनी भालोद येथील जावळे यांच्या निवासस्थानीही भेट दिली होती. केळीवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी एक आराखडा त्यावेळी शरद पवार यांना सादर केला. त्याला प्रारंभिक स्वरूपात त्यावेळी मंजुरीही दिली होती. दिल्ली येथे केळी वाहतुकीसाठी भुसावळ येथून स्वतंत्र रेल्वे गाडीही सुरू केली होती.

Amol Javale
Loksabha Election 2024 : आरक्षणाची मर्यादा वाढवू ; जाहीरनाम्यातून काँग्रेसचे आश्‍वासन,‘एमएसपी’साठी कायदा करणार

हरिभाऊंनाही होती ऑफर

२०१४ ला हरिभाऊ जावळेंची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपने रक्षा खडसेंना तिकीट दिले होते. त्यावेळीही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून जावळेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हरिभाऊ ‘हलले’ नाहीत. आता अमोल जावळेंना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, त्यांना मिळू शकली नाही.

त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जातेय. त्यांच्या समर्थकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पवार कुटुंबाने पुन्हा एकदा जावळे कुटुंबाला उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात अमोल जावळेंना थेट विचारणा केल्याची माहिती असून, रोहित पवारांवर त्यासंबंधी जबाबदारी सोपविल्याचेही बोलले जातेय.

"अमोल जावळेंना पक्षाकडून उमेदवारीबाबत काही विचारणा झाल्यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही. आपली रावेर लोकसभेसाठी उमेदवारीची दावेदारी कायम असून, त्यासंदर्भात अद्याप निर्णय व्हायचा बाकी आहे."-ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

Amol Javale
Loksabha Election 2024 : मतदानासाठी शाईचा महापुरवठा ; ‘म्हैसूर पेंट्स व व्हार्निश’ कंपनीला काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.