Jalgaon Lok Sabha Election : शहरात लोकशाहीच्या उत्सवाचा उत्साह! सकाळपासूनच मतदानासाठी रांगा

Lok Sabha Election : शहरातील सर्वंच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठी दांडगा उत्साह दिसून आला.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : शहरातील सर्वंच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठी दांडगा उत्साह दिसून आला. सकाळी ढगाळ वातावरण आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग मतदारांनी सकाळीच जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी गर्दी कमी होती. दहानंतर बहुतेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी उन्हाची तीव्रता वाढली, तरी मतदानाच्या रांगा कायम होत्या. ( spirit of celebration of democracy in city )

सेंट जोसेफ स्कूलमध्ये सकाळी सव्वासातला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदान केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा रेडक्रॉस सोसायटीत जाऊन नागरिकांनी उत्साह आणि उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

शहरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स आणि बॅचेस वितरित करण्यात आले. स्वयंसेवकांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर उपस्थित राहून सर्वांना हजारो बॅचेसचे वितरण केले. रेडक्रॉसच्या पदाधिकाऱ्यांसोबत छायाचित्र काढून त्यांचा मतदानासाठी उत्साह वाढविला.

आदर्श मतदान केंद्रे ठरली आकर्षण

शहरातील आर. आर. शाळेत चार मतदान केंद्रे होती. त्यात दिव्यांग मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, कला, संस्कृती थीमवर आधारित केंद्रे तयार केली होती. ती केंद्रे मतदारांना आकर्षक वाटत होती. मतदार केंद्राचे आकर्षक वातावरण पाहून मतदारांचा उत्साह वाढत होता.

दुपारनंतर तुरळक गर्दी

शहरातील शिवाजीनगर, पिंप्राळा, हुडको, हरिविठ्ठलनगर, रामानंदनगर, महाबळ कॉलनी, गणेश कालनी, जिल्हापेठ, तांबापुरा परिसर, जोशी पेठ, जुने जळगाव आदी परिसरातील सर्वंच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी होती. दुपारी अडीच ते चारदरम्यान बहुतांश मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. नंतर मात्र गर्दी वाढली. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : अंजनी प्रकल्प, ‘एमआयडीसी’सह प्रत्येकवेळी केवळ आश्वासनेच!

सेल्फी पाईंटवर गर्दी

बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मतदान केल्यानंतर स्वत:चे छायाचित्र काढण्यासाठी सेल्फी पाईंट ठेवला होता. त्यात सेल्फी काढण्यासाठी मतदारांची गर्दी होत होती. कोणी मित्रांसोबत, कोणी जोडपी, कोणी मैत्रीणीसोबत सेल्फी काढत होते. काढलेली सेल्फी फेसबुकवर टाकली जात होती.

मतदान केंद्रांवर आरोग्याची सुविधा

मतदान केंद्रांवर दोन पारिचारिका, एक डाॅक्टर, असे तीन जण आरोग्य सुविधेसाठी ठेवले होते. पाळणाघराची व्यवस्थाही होती. काही ठिकाणी मतदारांनी पाळण्यात लहान बालकांना ठेवून मतदान केले.

मतदारांची नावे गायब

शहरातील कासमवाडी, गणेशनगरातील काही मतदारांची नावे आर. आर. विद्यालयात होती. यापूर्वी त्या मतदारांची नावे गणेशनगरातील शाळेत होती. यंदा मतदान केंद्र बदल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. ज्या मतदारांना मतदान केंद्र बदलाची माहिती मिळाली, ती त्यांनी इतरांना दिली. यामुळे आर. आर. शाळेतील मतदान केंद्रावर दिवसभर मतदानासाठी गर्दी होती.

अनेकांची नावे डिलीट

अनेक मतदान केंद्रावरील यादीतून मतदारांची नावे डिलीट झाली होती. मतदान केंद्राची माहिती मतदारांना असल्याने ते मतदान केंद्रावर मतदानासाठी आले. मात्र, तेथे ‘नावे डिलीट’ असल्याचे कळाल्याने मतदान न करता ते परत गेले.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : तावडे, बावनकुळेंच्या सूचनेनुसार प्रचारात; सून रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात

‘वेबकास्टिंग, अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांचे वॉचिंग

जिल्ह्यातील १ हजार ९८९ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग झाले. त्याचा केंद्रबिंदू जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात होता. त्याठिकाणी सहा मोठ्या स्क्रीनवर रावेर व जळगाव मतदारसंघांतील १ हजार ९८९ मतदान केंद्राचे लाईव्ह चित्रण सुरू होते. ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, इतर अधिकारी वॉच करीत होते.

कोठे गडबड आहे का? मतदान केंद्रावर आत व बाहेर काय स्थिती आहे, याचे वेळावेळी चित्रणातून दिसत होते. काही अनुचित प्रकार वाटल्यास जिल्हाधिकारी, इतर अधिकारी संबंधित केंद्रप्रमुखाला भ्रमध्वनीवरून तेथे सुरू असलेला प्रकार थांबविण्याचे सांगत होते.

दोन केंद्रावरील कर्मचाऱ्यांना नोटिसा

वेबकास्टिंग करताना जामनेरमधील एक व डोणगाव (ता. धरणगाव) येथील एक, अशा दोन मतदान केंद्रांवर मतदार नसल्याने तेथील कर्मचारी मतदान केंद्राबाहेर फेऱ्या मारीत होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दोन्ही ठिकाणच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकीद देत, कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अन्य एका केंद्रावर कर्मचारी जेवण करतानाचे वेबकास्टिंगमध्ये दिसत होते. त्या संबंधितालाही नोटीस देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! जळगाव, रावेरसाठी सोमवारी मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.