रावेर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील मतदानासाठी एकूण नऊपैकी चार शाळा विविध संकल्पनांनी सजविण्यास सुरवात झाली आहे. यात कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘केळीचे आगार’, एन. एन. अकोले महाविद्यालयात पाल वन्यजीव अभयारण्य जंगल सफारीवर आधारित ‘पर्यावरण पर्यटन’, तर यशवंत महाविद्यालयात सखी मतदान केंद्र व मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये बालस्नेही मतदान केंद्र बनविण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. ( Lok Sabha Polling station decorated with innovative concepts news)
शहरातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी उष्माघात कक्ष असेल. यात प्रथमोपचार व उष्माघात प्रतिबंधक औषधे असतील. स्तनदा माता व मतदारांसोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी पाळणा घर, यात मुलांसाठी आकर्षक सजावट व खेळणी ठेवण्यात येणार आहेत. स्तनदा माता व बालकांना आराम करण्यासाठी सर्व बालसंगोपन केंद्रावर गादी, पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक, अशी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आशावर्कर व अंगणवाडीसेविकांची महिला मतदारांना मदत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, याशिवाय शहरामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी महिला बचत गटांची मदत पालिका घेत आहे. (latest marathi news)
मतदान वाढविण्यासाठी स्पर्धा
शहरातील मतदान केंद्रावर मतदान शंभर टक्के व्हावे, यासाठी महिला बचत गटांच्या महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिला बचत गटांतील महिला एका रंगाचे पोषाख परिधान करून ग्रुपमध्ये मतदान करतील. जे महिला बचतगट जास्तीत जास्त स्त्रियांना मतदान करवून घेतील व सेल्फी अपलोड करतील, त्यांना रावेर नगरपालिकेकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या शहरी भागात पालिका कर्मचाऱ्यांचा चमू घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. वोटर स्लिप प्रत्येक मतदाराला भेटली का याची खात्री करीत आहे. शहरातील सर्व मतदारांचे व्हॉट्सॲप क्रमांक घेऊन त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची मतदान करण्याचे आवाहन करणारी ध्वनिचित्रफित प्रसारित करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.