Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

Jalgaon Political : भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील उमेदवारांची पहिली यादी प्रसिध्द झाली.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal
Updated on

Jalgaon Political News : भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील उमेदवारांची पहिली यादी प्रसिध्द झाली. दुसऱ्या यादीत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप कोणते उमेदवार देते, याबद्दल उत्सुकता आहे. भाजपची नावे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची नावेही निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात येते.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडे विद्यमान खासदारासह इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. (Jalgaon lok sabha election After announcing names of Jalgaon and Raver BJP candidates names of opposition parties will also declare)

जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा भक्कम दावा आहे. त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. त्यांनी संपर्कही सुरू केला आहे. जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय माजी खासदार ए.टी. पाटील यांचे मागील वेळेस तिकीट कापले होते. परंतु ते आता पुन्हा शर्यतीत आहे.

माजी आमदार स्मिता वाघ यांनी पक्षाकडे उमेदवारीच दावा केला आहे. रावेर मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असा दावा केला जात आहे. श्रीमती खडसे यांनीही कामाच्या आधारे उमेदवारीचा दावा करुन, मोदींसाठी कोणत्याही उमेदवारासाठी कामाची तयारी दर्शवली आहे.

माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील इच्छुक आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा सुरू आहे. भाजपत दोन्ही मतदार संघात मोठ्या प्रमाणात दावेदारी असल्याने पक्ष नेतृत्व कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे.

विरोधकांचेही लक्ष

जळगाव व रावेर दोन्ही मतदार संघात विरोधी महाविकास आघाडी उमेदवार उभे करणार आहे. जळगाव मतदार संघ आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे यांच्याकडे ही जागा गेल्याचे निश्‍चित आहे. त्यांच्याकडे पारोळा येथील हर्षल माने व जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील इच्छुक आहेत. (latest marathi news)

Lok Sabha Election
Jalgaon News : अवकाळीमुळे करंजी बुद्रूक शिवारात शेतीचे नुकसान

रावेर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला आहे. या पक्षातर्फे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांचे नाव जाहिर झाले होते. मात्र, तब्बेतीच्या कारणास्तव त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. आता पक्षातर्फे जिल्हा बँकेचे संचालक पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या उमेदवारीच्या नावाची चर्चा आहे.

मात्र पक्षातर्फे अंतीम निर्णय नसल्याचेही सागंण्यात येत आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात विरोधकांचे उमेदवार निश्‍चीत नसल्याचे सागंण्यात येत आहे. भाजपचे उमेदवार निश्‍चित झाल्यनंतरच विरोधकांकडून उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.

काहींची नाराजी ओढवणार

भाजपकडे इच्छुक अधिक असल्याने काही जण नाराज होण्याची शक्यता आहे. जळगावमध्येही तीच स्थिती आहे. भाजपमधील तिकीट नाकारलेल्या उमेदवाराला उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघातही शरदचंद्र पवार पक्षातर्फे भाजपच्या उमेदवारी जाहिर झाल्यानंतर जोरदार राजकीय उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहिर होण्याचीच प्रतिक्षा आहे.

Lok Sabha Election
Jalgaon Gold- Silver Rate : 3 दिवसात सोन्यात 1900 तर चांदीत 2 हजारांची उसळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.