Jalgaon News : महाविकास आघाडी तसेच मित्र पक्षाबाबत नाराजी असेल तर कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगावे. त्यांच्या मनातील शंका दूर करण्यात येतील, मात्र त्याचा राग निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारावर काढू नये. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्य करून दोन्ही मतदारसंघात विजयश्री खेचून आणावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांनी केले. (Jalgaon Loksabha Election meeting of Maha Vikas Aghadi leader appealed to all workers of party to bring victory in constituency)
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात महाविकास आघाडीची शनिवारी बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडीचा जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवार लवकरच घोषित करण्यात येतील.
जो उमेदवार घोषित होईल, त्याला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. महायुतीला फायद्याचे ठरणारे कोणतेही वक्तव्य महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी करू नये. त्यांना काही अडचणी असतील, कुणाविरुद्ध नाराजी असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी प्रचार नियोजनावर चर्चाही करण्यात आली. (latest marathi news)
जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे व रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करावेत. तसेच कार्यकर्त्यानी निवडणुकीच्या काळात पक्षाला अधिक वेळ द्यावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांकडून काही सूचना करण्यात आल्या, त्याचीही नोंद घेण्यात आली. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, विराज कावडीया,माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील महाजन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, लीलाधर तायडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.