Jalgaon Muskmelon News : लोणीचे खरबूज काश्‍मिरच्या दारी! ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्याला मिळाले लाखोचे उत्पन्न

Jalgaon News : खरबुजाची भुरळ सर्वत्र पडत असून, लोणी (ता. चोपडा) येथील खरबूज थेट काश्मिरात पोहचले आहे.
Melon harvesting going on in Loni (T. Chopra) field.
Melon harvesting going on in Loni (T. Chopra) field.esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : खरबूज म्हणजे खाल्ल्यावरही बोटे चाटायला लावणारे फळ. खान्देशात दशकापूर्वी त्याचे वेगवेगळे वाण आले आणि खान्देशी मातीत रुजले. रेतीचे पीक मातीत आले. याच खरबुजाची भुरळ आता सर्वत्र पडत असून, लोणी (ता. चोपडा) येथील खरबूज थेट काश्मिरात पोहचले आहे. (Jalgaon loni muskmelon export to Kashmir marathi news)

नरेंद्र पाटील यांनी डिसेंबरमध्ये सात बिघे क्षेत्रात लागवड केलेल्या खरबुजाची आता काढणी सुरू झाली आहे. त्यातील उच्च प्रतीच्या मालाची काश्‍मिरमध्ये रवानगी झाली आहे. कधीकाळी खान्देशच्या नद्यांमध्ये नदीपात्रातील रेतीत जाम, टिटवे, जाळीचे डांगर असे वाण डांगराबरोबर पिकवले जात असत.

टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. पण, कालांतराने नद्या लुप्त होऊ लागल्याने डांगर, टरबुजासह खरबुजाची लागवड रेतीऐवजी मातीत होऊ लागली. नदीतील प्रयोग शेतीत होताना दिसू लागले.  (latest marathi news)

Melon harvesting going on in Loni (T. Chopra) field.
Benefits Of Watermelon: टरबूज खाण्याचे हे चमत्कारिक फायदे कदाचित माहिती नसतील तुम्हाला

खरबुजाचे वेगळे वाण

पाटील यांनी आपल्या शेतात वेगवेगळे वाण लागवड केले आहेत. लागवड केलेल्या खरबुजापैकी उत्तम प्रतीचा माल २० रुपये किलोने त्यांनी जागेवर विक्री केला असून, तो व्यापाऱ्यामार्फत काश्‍मिरमध्ये जात आहे. वेगवेगळ्या प्रतिप्रमाणे आणि दरानुसार त्याची टप्प्याटप्प्याने काढणी होणार असून, गुणवत्तेप्रमाणे वेगवेगळ्या दरात त्याची विक्री होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे ते खरबुजाचे उत्पादन घेत असून, यावर्षी त्यांना ८० ते ९० टन माल निघण्याची अपेक्षा आहे.

Melon harvesting going on in Loni (T. Chopra) field.
Watermelon Roha to Dubai: रोह्यातील शेतकऱ्याचा कलिंगड थेट दुबईला रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.