Jalgaon News: सांडपाणी प्रकल्पातील कोट्यवधींची मशिनरी पडून! वॉरंटी संपली; महापालिकेचे डिझेलवरील 80 लाख रुपये पाण्यात

Jalgaon News : या योजनेंतर्गंत शहरात २१६ किलोमीटरची भूमिगत गटार तयार केली आहे. ४८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : येथील महापालिकेकडून २०१९ मध्ये अमृत योजनेंतर्गंत मलनिस्सारण योजनेचे कार्यादेश दिले होते. या योजनेंतर्गंत शहरात २१६ किलोमीटरची भूमिगत गटार तयार केली आहे. ४८ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे.

मात्र, अडीच वर्षांपासून त्या प्रकल्पाला वीजजोडणी न झाल्यामुळे सांडपाणी प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. महापालिका प्रशासनाच्या कासव गती कारभारामुळे प्रकल्पाच्या मशिनरी धूळखात पडल्या असून, मशिनरी न वापरता पडून त्यांची वॉरंटी संपली आहे. (Jalgaon Machinery worth crores of waste water project)

शिवाजीनगरातील जुन्या खत कारखान्याच्या जागेवर महापालिकेने तब्बल १९६ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अमृत योजनेतून प्रस्तावित केला होता. प्रकल्पाच्या कामाला ऑगस्ट २०१९ मध्ये सुरवात झाली. डिसेंबर २०२१ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. महापालिका अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याअभावी अडीच वर्षांपासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला वीजजोडणी होऊ शकलेली नाही.

आजही हा प्रकल्प वीजेअभावी बंद आहे. प्रकल्पामधील पंपींग मशिनरी खराब होऊ नये, म्हणून दर आठवड्याला ३ ते ४ तास ती मशिनरी डिझेलच्या सहाय्याने सुरू करावी लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८० लाख डिझेलवर खर्च झाले आहेत. प्रकल्पात बसविलेली कोट्यवधी रुपयांची मशिनरीची वॉरंटी संपल्यामुळे यदा कदाचित ही मशिनरी खराब झाली, तर त्या मशिनरीच्या दुरुस्तीचा खर्चही महापालिकेलाच करावा लागणार आहे.

रेल्वे क्रॉसिंगचे कारण

अमृत योजनेंतर्गंत होणाऱ्या मलनिस्सारण (सांडपाणी) योजना सुरू करण्यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून दोन ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाइपलाइन करावयाची आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू करता येत नसल्याचे कारण सांगितले जात होते. हे काम पूर्ण झाल्यानंतरही महापालिका प्रकल्प विभागाकडून सांडपाणी प्रकल्पाला वीजजोडणी केलेली नाही. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Deputy Speaker: विरोधक उपाध्यक्ष पदासाठी इतके आग्रही का आहेत? कोणते अधिकार आणि जबाबदारी मिळतात...

महापालिका प्रकल्प विभागाकडून प्रकल्प कधी सुरू होणार, याचे उत्तर टाळले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया सध्या जळगाव शहरात होत नसून सांडपाणी नदी, नाले व मेहरूण तलावात सोडले जात आहे.

असा आहे प्रकल्प

*४ एकर जागेत उभारला प्रकल्प

*१९६ कोटी रुपयांचा निधी खर्च

*३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचा करार

*२०२१ पासून प्रकल्पाचे काम पूर्ण

*४८ दशलक्ष लिटर पाण्यावर होणार प्रक्रिया

*२१६ किलोमीटरची टाकली पाइपलाइन

*दोन ठिकाणी रेल्वे लाईनखाली पूल

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Rain News : एरंडोल तालुक्यातील पावसाबाबत महसूल प्रशासनातर्फे दिशाभूल! जोरदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.