Jalgaon Maize Crop Crisis: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव! शेतकरी संकटात; कृषी विभागाकडून शेतात जाऊन मार्गदर्शन

Agriculture News : अशा परिस्थितीत पिकांचे अधिक नुकसान होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
army worm on maize
army worm on maizeesakal
Updated on

वावडे (ता.अमळनेर) : मका पिकावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत पिकांचे अधिक नुकसान होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. (Maize army worm infestation Farmers in distress)

अमळनेर तालुक्यात यंदा १६ हजार ५४३ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झालीय. कमी खर्चात जास्त उत्पादन म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. तीन आठवड्यांपूर्वी पेरणी झालेल्या पिकांना आठवड्यातील समाधानकारक पावसाने तारले. मात्र, मका पिकावर पडलेल्या अमेरिकन लष्करी अळीने मारले आहे.

त्यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आजवर सोसलेले नुकसान काहीअंशी भरून निघण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन केले. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार सुरूवात केली.

मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मका, कपाशी, सोयाबीन, तूर, भुईमूग, बाजरीची लागवड केली. त्यानंतर पावसाने पोबारा केल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनारागमन झाले. सलग दोन, तीन दिवस झालेल्या दमदार पावसाने पिकांना एकीकडे जीवदान मिळाले. (latest marathi news)

army worm on maize
Supreme Court : समलिंगी पुरुष,ट्रान्सजेंडर व्यक्ती अन् SEX वर्कर्स यांना रक्तदान करण्यास बंदी का? सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

लागवड केलेला मकाही तरारला असतानाच अमेरिकन लष्करी अळीने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर पीक मोडून टाकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मक्यावर आलेली लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी रासायनिक किटनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

"पहिल्या अवस्थेतील कोवळ्या पानावर पांढरे ठिपके पडणे, हे लष्करी अळीच्या आक्रमणाचे संकेत आहेत. त्यामुळे शेतात अशा प्रकारचा पाच टक्के प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर एकरी पाच सापळे याप्रमाणे करावा. निंबोळी अर्क पाच टक्के, निमयुक्त कीटकनाशकाची फवारणी करावी. शेतात पक्षी थांबे निर्माण करावेत."- नीशा सोनवणे, कृषी सहायक, वावडे मंडळ (ता. अमळनेर)

army worm on maize
Jalgaon News : सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह ग्रामस्थही त्रस्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.