Jalgaon News : विद्यार्थ्यांची शाळेसाठी चिखल तुडवत कसरत; फैजपूरला विद्यार्थ्यांसह नागरिकांची दैना

Jalgaon News : फैजपूर शहरात पावसाळ्यामुळे अनेक भागांमध्ये चिखल झाला आहे. पालिकेने काही ठिकाणी मुरूम टाकून नागरिकांना गाजर दाखविण्याची शक्कल लढविण्यात आली आहे.
Students and citizens walking through the mud.
Students and citizens walking through the mud.esakal
Updated on

फैजपूर : शहरात पावसाळ्यामुळे अनेक भागांमध्ये चिखल झाला आहे. पालिकेने काही ठिकाणी मुरूम टाकून नागरिकांना गाजर दाखविण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. विस्तारीत वस्त्यांमधील नागरिकांना चिखल तुडवीत कसरत करावी लागत आहे. नागरिकांची समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे. शहरातील जुन्या वस्त्या वगळता काही नवीन रहिवासी वस्त्यांमध्ये रस्ते गटारी व अत्यावश्यक नागरी सुविधांचा अभाव आहे. (Jalgaon News)

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही भागांमध्ये योग्य पाण्याच्या निचराअभावी पावसाचे पाणी गटारीधून थेट रस्त्यावर येत असल्याचे काही भागांमध्ये चित्र पाहावयास मिळते. नागरिकांनी पालिकेत अनेक वेळा प्रत्यक्ष सांगूनही उपाययोजना केली गेली नसल्याची ओरड सुरू आहे. ज्या भागांमध्ये रस्ते नाही.

त्या भागात पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले जावून मोठ्या प्रमाणावर चिखल झाले आहे. या चिखलातून वाट काढून चिखल तुडवीत कसरत करावी लागत आहे. पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात आवश्यक ठिकाणी मुरूम, खोळवा, कच टाकण्याचा वार्षिक ठेका दिला जातो. त्याचे बिल पालिका फंडातून अदा केले जाते. यावर्षी देखील वार्षिक ठेका पालिकेने दिला आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने पालिकेकडून मुरूम टाकण्याची मागणी पुढे आल्याने नागरिकांना गाजर दाखवत शहरात काही ठिकाणी अंदाजे दहा-पंधरा डंपर मुरूम टाकून रडणाऱ्यांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केले गेले. शहरात ज्या भागांमध्ये चिखलाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तेथे अपेक्षित असताना मुरूम टाकला जात नसल्यामुळे जनभावना तीव्र झाली आहे. (latest marathi news)

Students and citizens walking through the mud.
Jalgaon News : वाडे येथील जवानावर अंत्यसंस्कार; रेल्वे अपघातात 3 दिवसांपूर्वी झाला होता मृत्यू

दुसरीकडे वार्षिक ठेका असताना टाकलेल्या मुरूमचे बिल मिळणार नाही, तोपर्यंत मुरूम न टाकण्याचा पवित्रा संबंधित ठेकेदाराने घेतल्याने अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी मुरूम टाकून नागरी समस्या सोडवण्याऐवजी संबंधित ठेकेदाराचे बिल काढण्याची घाई का? असा संतप्त प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात काही ठिकाणी डंपरने तर डंपर जाणार नाही अशा ठिकाणी ट्रॅक्टरने मुरूम टाकण्यात आले. असे केवळ दहा-पंधरा डंपर मुरूम टाकण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यासाठी स्वतःप्रभारी मुख्याधिकारी यांनी शहरात मुरूम टाकण्यात आलेल्या ठिकाणची स्थळ पाहणी केल्याशिवाय तसेच नागरिकांची मागणी असलेल्या ठिकाणी मुरूम टाकल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला पालिकेने बिल अदा करू नये, अशी मागणी पुढे आली आहे.

Students and citizens walking through the mud.
Jalgaon News : एरंडोलला योजनांची 630 प्रकरणे मंजूर! समितीच्या बैठकीत निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.