दुसरी लाट ओसरतेय..चार तालुक्‍यात सक्रीय रुग्ण पन्नासच्या आत

दुसरी लाट ओसरतेय..चार तालुक्‍यात सक्रीय रुग्ण पन्नासच्या आत
coronavirus
coronavirus
Updated on

जळगाव : कोरोना महामारीची (Coronavirus second wave) दुसरी लाट आता ओसरत असल्याचे आशादायी चित्र जिल्ह्यात आहे. अमळनेर, चोपडा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ५० च्या आत आली आहे. तर दैनंदिन कोरोना (Jalgaon corona update) चाचण्यातही काल ७७ रुग्णच पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. (jalgaon-coronavirus-update-second-wave-four-taluka-active-patient-fefty-down)

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या १ हजार ७३३ पर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या १०० च्या आत आहे. चार तालुक्यात ५० च्या आत आली ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

coronavirus
जळगाव जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

दुसऱ्या लाटेत सक्रीय रुग्ण बारा हजारावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १२ हजाराच्या जवळपास पोहोचली होती. कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवून बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेणे, कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करणे उपाययोजना तातडीने राबविल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती आता १७३३ पर्यंत खाली आली आहे.

जळगाव, भुसावळ, चोपडा येथे अधिक रुग्ण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती. उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या ही शंभरच्या आत आली असून चार तालुक्यात ही रुग्ण संख्या ५० पेक्षाही कमी झाली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, एरंडोल, रावेर, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यात रुग्णसंख्या १०० पेक्षा अधिक आहे.

coronavirus
२५ हजाराचा लाच..तलाठीसह पंटर जाळ्यात

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण

जळगाव शहर-१५२, जळगाव ग्रामीण-७९, भुसावळ-१६५, अमळनेर-४५, चोपडा-५५, पाचोरा-९४, भडगाव-३०, धरणगाव-२४, यावल-८३, एरंडोल-२०१, जामनेर-१४४, रावेर-१०५, पारोळा-४६, चाळीसगाव-३७७, मुक्ताईनगर-६१, बोदवड-५३ व इतर जिल्ह्यातील-१९ असे एकूण १ हजार ७३३ रुग्ण.

जिल्हा अनलॉकच्या टप्पा-१ मध्ये असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हावासियांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलीस व महसुल प्रशासनासह आरोग्य व इतर शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.

– अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()