Jalgaon Market Committee Election : 26 अर्ज नामंजूर; 213 जणांचे नामनिर्देशनपत्र मंजूर

Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committeesesakal
Updated on

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीत बुधवारी (ता. ५) २६ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले, तर २१३ जणांचे नामनिर्देशपत्र मंजूर करण्यात आले. (Jalgaon Market Committee Election 26 application rejected Nomination papers of 213 person approved jalgaon news)

जळगाव बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जांची छाननी करण्यात आली. एकूण २६८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २६ अर्ज नामंजूर झाले. सर्वसाधारण (सोसायटी मतदारसंघ) १० अर्ज नामंजूर झाले, तर भटक्या विमुमक्त जाती जमाती (सोसायटी मतदारसंघ) २, सर्वसाधारण (ग्रामपंचायत मतदारसंघ) १०, अनुसूचित जमाती (ग्रामपंचयात मतदारसंघ) ३, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ग्रामपंचायत मतदारसंघ) एक, असे अर्ज नामंजूर करण्यात आले. एकापेक्षा अधिक २९ नामनिर्देशपत्र आले आहेत. एकूण २१३ नामनिर्देशपत्र वैध आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Jalgaon Market Committees
Gold and Silver : सोने ६२ हजार, तर चांदी ७७ हजारांवर...

राहिलेले एकूण मतदारसंघनिहाय अर्ज असे : सर्वसाधारण (सोसायटी मतदारसंघ) ७३, महिला राखीव (सोसायटी मतदारसंघ) २०, इतर मागासवर्ग (सोसायटी मतदारसंघ) २०, भटक्या विमुक्त जाती जमाती (सोसायटी मतदारसंघ) २१, सर्वसाधारण (ग्रामपंचायत मतदारसंघ) ३०, अनुसूचित जमाती (ग्रामपंचायत मतदारसंघ) १६, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ग्रामपंचायत मतदारसंघ) १५, व्यापारी मतदारसंघ १२, हमाल मापारी मतदारसंघ ६.

Jalgaon Market Committees
Jalgaon News : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदत फेरीतून 10 हजारांचे सहाय्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()