Jalgaon Market Committee Election : हमाल मापाडी मतदारसंघात तब्बल 600 मतदार बोगस

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून त्यासाठी २८ एप्रिलला मतदान आहे. (Jalgaon Market Committee Election 600 false voters in Hamal Mapadi Constituency jalgaon news)

मात्र, मतदानापूर्वीच हमाल- मापाडी तोलारी मतदारसंघात तब्बल सहाशेवर मतदार बोगस असल्याचा धक्कादायक आरोप निवडणुकीतील उमेदवार देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरु असून जळगाव बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान होत आहे. या निवडणुकीत हमाल मापाडी मतदारसंघात एकूण ८८६ मतदार असून त्यात सहाशेहून अधिक मतदार बोगस व बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन एका विशिष्ट गटाला फायदा व्हावा म्हणून ही बोगस नावे समाविष्ट करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात धुडकू सपकाळे यांनी मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. बोगस मतदार असलेल्या नावांची यादीही गेल्या १० एप्रिलला सादर केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही चौकशी न करता एकतर्फी हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Market Committee election
Jalgaon Bingo Circus : सर्कस मोजतेय अखेरच्या घटका...! डोलारा हाकताना मालकाची ‘कसरत’

हमालांवर अन्याय

या बनावट नावांमुळे जे मुळ हमाल- मापाडी आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे. अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे हे निवडणूक प्रचारादरम्यान काही गावांमध्ये गेले असता मतदारयादीतील नावांच्या पत्त्यावर मतदार आढळून आले नाहीत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

जळगाव बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. शुक्रवार (ता.२८) रोजी मतदान होणार आहे. जळगावसह पाच ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत. यासाठी जळगाव, कानळदा, सावखेडा, उमाळा व वावडदा येथे मतदान केंद्र आहेत.

जळगाव येथे नूतन मराठा कॉलेज आवारात एकूण साथ बूथ आहेत, तर तर कानळदा, सावखेडा, उमाळा व वावडदा येथे जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्राचे बूथ आहेत. सकाळी आठला मतदानास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी पाचला मतदान बंद होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांनी कळविले आहे.

Jalgaon Market Committee election
Gulabrao Patil : सत्तेच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट करणार : गुलाबराव पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.