Jalgaon Market Committee Election : 10 दिवस उलटूनही एकही माघार नाही! दिग्गजांच्या पॅनलमध्ये लढत

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon Market Committee Election : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कणा असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तापत असून, १८ जागांसाठी तब्बल २१३ उमेदवार रिंगणात आहेत.

दहा दिवस उलटूनही एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. गुरुवारी (ता. २०) माघारीची अंतिम मुदत आहे. माघारीनंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (Jalgaon Market Committee Election after 10 days no retreat news)

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २६ अर्ज नामंजूर झाल्याने आता २१३ उमेदवार रिंगणात असून, आतापर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही.

त्यामुळे सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघातून ११ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाच्या दोन जागांसाठी ३० उमेदवार, तर महिला राखीव सोसायटी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी २० उमेदवार मैदानात आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Dada Bhuse : आपत्तीग्रस्तांकडून पीककर्ज वसुली नको : पालकमंत्री दादा भुसे यांचे निर्दश

व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी १२ उमेदवार, तर हमाल व मापारी मतदारसंघाच्या एका जागेेसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. आजी-माजी संचालकांसह नवीन उमेदवार रिंगणात आहेत. आता २० एप्रिलला अंतिम माघार झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण राहणार आणि कोण कोणविरुद्ध दंड थोपणार, याचे चित्र दुपारी तीननंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे पॅनल आणि भाजप-शिंदे गट युतीचे पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे. यामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Jalgaon Market Committee election
Nashik News: महाराष्ट्रदिनानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह; धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.