Jalgaon Market Committee Election : भाजप, शिंदे गट विरुध्द ‘मविआ’त लढत!

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी २१३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. गुरुवारी (ता. २०) माघारीचा अंतिम दिवस होता. (Jalgaon Market Committee Election Now 51 candidates are in election for 18 seats jalgaon news)

तब्बल १६८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीवरून शेवटच्या क्षणी भाजप, शिंदे गटात नाराजीनाट्य रंगले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी माघार घेतली.

बुधवारी (ता. १९) माजी सभापती कैलास चौधरी यांच्यासह १३ उमेदवारांनी माघार घेतली, तर गुरुवारी लालचंद पाटील, रजनीबाई प्रभाकर पवार यांच्यासह १५६ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भाजप-शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होणार आहे.

भाजप- शिंदे गटात नाराजीनाट्य

माघारीच्या शेवटच्या दिवशी बाजार समितीत मोठी गर्दी होती. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी माघारी घेतली. मात्र, भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या काही उमेदवारांमध्ये माघारीसाठी नाराजीनाट्य रंगल्याचे दिसून आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची तृतीयपंथींनी स्वीकारली जबाबदारी

मतदारसंघनिहाय लढणारे उमेदवार व कंसात निवडून द्यावयाच्या जागा : सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ १६ (७), सोसायटी मतदारसंघ महिला राखीव ६ (२), सोसायटी मतदारसंघ इतर मागासवर्ग ४ (१), सोसायटी मतदारसंघ भटक्या जाती, विमुक्त जमाती व वि.मा.प्र ६ (१), सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदारसंघ ६ (२), ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती ३ (१), ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक ३ (१), व्यापारी मतदारसंघ ४ (२), हमाल, मापारी मतदारसंघ ३ (१).

महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे

सर्वसाधारण मतदारसंघ-श्‍यामकांत सोनवणे (सुजदे), लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर (खापरखेडा), सुनील महाजन (मेहरूण), मनोज दयाराम चौधरी (आवार), जयराज चव्हाण (कानळदा), योगराज सपकाळे (फुफणी), ईश्‍वर पाटील (आव्हाणे), ओबीसी मतदारसंघ- पांडुरंग पाटील (धनबाद), नीलेश पाटील (पाथरी),

महिला राखीव मतदारसंघ-लीना पंकज महाजन (नशिराबाद), साधना शिवाजी पाटील (बिलवाडी), ग्रामपंचायत मतदारसंघ-दिलीप कोळी (आसोदा), डॉ. अरुण पाटील (वडली), वैशाली चव्हाण (धानोरा), सूरज नारखेडे (भादली), व्यापारी मतदारसंघ- संदीप पाटील, संजय महाजन आदी.

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : पाडसे विकास संस्थेवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

भाजप-शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार

ग्रामपंचायत जनरल मतदारसंघ-मनोहर पाटील (उमाळा, शिवसेना शिंदे गट), मिलिंद चौधरी (भादली, भाजप), आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ- पंकज साहेबराव पाटील (तरसोद), अनुसूचित जाती जमाती मतदार संघ-ललिता जनार्दन कोळी (विदगाव), सोसायटी मतदारसंघ- अनिल भोळे, सुभाष महाजन, जितेंद्र पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश श्‍यामराव पाटील (सर्व शिवसेना शिंदे गट), प्रभाकर सोनवणे व सुधीर सुर्वे (भाजप),

ओबीसी मतदारसंघ-राजेंद्र प्रल्हादराव चव्हाण (शिवसेना शिंदे गट), हेमलता नारखेडे व मीना शालीक पाटील (भाजप), एनटी मतदारसंघ- समाधान धनगर (शिवसेना शिंदे गट), व्यापारी मतदारसंघ-अशोक मुंदडा (भाजप), शशिकांत बियाणी (शिवसेना शिंदे गट), हमाल व मापारी मतदारसंघ-यमुनाबाई सपकाळे (शिवसेना शिंदे गट) आदी.

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : वादळी वाऱ्याचे धूमशान; झाडांच्या फांद्या तुटल्या; वीजपुरवठा खंडित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.