Jalgaon Market Committee Election Result : शिवसेना बंडखोरांना धक्का; खडसे, देवकर, पाटलांचे यश

market committee election
market committee election esakal
Updated on

Jalgaon Market Committee Election Result : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर झाले. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून बाहेर पडलेले व पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील, बोदवडला चंद्रकांत पाटील यांना मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, अनिल पाटील व माजी आमदार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात बाजार समित्यांवर यश मिळाले आहे. यावल बाजार समितीत भाजपचे अमोल हरिभाऊ जावळे यांचे नेतृत्व उजळले आहे. (Jalgaon Market Committee Election Result Shock to Shiv Sena rebels Success of Khadse Deokar Patal news)

जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता.२८) मतदान झाले होते. त्यातील सहा बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी (ता.२८) होऊन निकाल जाहीर झाले. आज रविवारी उर्वरित सहा बाजार समित्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.

अशी आहे स्थिती

जळगाव, अमळनेर, बोदवड समितीवर महाविकास आघाडीने निर्विवाद यश मिळविले आहे. यावल, धरणगाव, बाजार समितीवर युतीने यश मिळविले आहे. पाचोरा येथील बाजार समितीची त्रिशंकू स्थिती आहे.

तेथे शिवसेना शिंदे गटाला ९, महाविकास आघाडीला ७ तर भाजप गटाला दोन जागा मिळाल्या. या ठिकाणी भाजप गट स्वतंत्र लढला आहे, त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची अद्याप दोघांना प्रतीक्षा आहे.

जळगावात पालकमंत्र्यांना धक्का

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट व भाजप युतीने ही निवडणूक लढविली होती.

त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस प्रणीत महाविकास आघाडी पॅनेलतर्फे लढत देण्यात आली, यात महाविकास आघाडी ११, युतीला सहा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याने मंत्री पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. देवकर यांनी आपल्या नेत्वृत्वाचा करिष्मा दाखवून दिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

market committee election
Market Committee Election : चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने भाजप सत्तेत ! अनोखी युती

धरणगावात यश पण..

पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धरणगाव बाजार समितीत बारा जागा मिळत बहुमत मिळाले आहे. मात्र, महाविकास आघाडीने त्यांना जोरदार टक्कर दिली असून त्यांच्या सहा जागा निवडून आल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या गटाने पालकमंत्र्याच्या गटाला पाठिंबा दिल्यामुळे मंत्री पाटील गटाला फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका गटाच्या आधारमुळे बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ खडसेंनी मारली बाजी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी बोदवड बाजार समितीत तब्बल १७ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले आहे. शिंदे गटाचे विदयमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.

आमदार अनिल पाटलांचे वर्चस्व

अमळनेर बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत.

भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील, स्मिता वाघ, शिरीष पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. तीन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. तीनही अपक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

market committee election
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी

आमदार पाटलांच्या वर्चस्वाला धक्का

पाचोरा बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती, परंतु यावेळी त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या गटाला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत.

त्यांना सत्तेसाठी एक जागा कमी आहे. महाविकास आघाडीला सात जागा आणि भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गट स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे आता भाजप कुणाला पाठिंबा देणार याची प्रतीक्षा आहे.

भाजपच्या जावळेंचे नेतृत्व उजळले

यावल बाजार समितीत भारतीय जनता पक्षांची सत्ता होती, ती कायम राखण्यात भाजपचे युवा नेतृत्व व माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्वही उजळून निघाले आहे. त्यांच्या गटाला तब्बल १५जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

market committee election
Aviral Godavari: काँक्रिटीकरण काढण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई नको; डॉ. राजेंद्रसिंह यांचे नाशिककरांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.