भुसावळ : गणेशोत्सवाला दोनच दिवस शिल्लक असत्यामुळे भाविकांनी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली असून, ग्राहकांसाठी भुसावळ बाजारपेठ सजली आहे. (Market decorated with Ganeshotsav 2024).बाजारपेठेत आकर्षक कृत्रिम फुलांच्या माळा व तोरण, झिरमिळ्या, रिमझिम, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारच्या साहित्यांच्या खरेदीवर भाविकांचा भर आहे. सात सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असून, गणेशभक्तांमध्ये आतुरता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी घराला रंगरंगोटी सुरू आहे. घरांसह परिसर स्वच्छ केला जात आहे. शहरात राहणाऱ्यांची पावले गावाकडे वळलेली आहेत. दुसरीकडे गणेशोत्सव सजावटीसाठी गणेशभक्तांकडून नियोजन केले जात आहे. त्या दृष्टीने गणेश सजावटीचे साहित्य बाजारपेठेत आहे. त्यामध्ये गणेशोत्सवासाठी आकर्षक अशा फुलांच्या माळा आहेत. दुकानाबाहेर लटकवलेल्या या रंगीबेरंगी फुलांच्या माळा नागरिकांना आकर्षित करीत आहेत. त्यामध्ये मणी आणि रंगीत धाग्यांनी बनविलेल्या माळांचाही समावेश आहे. काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यांमध्ये बनवलेल्या माळादेखील आहेत. (latest marathi news).Jalgaon News : सभासदांना 8 टक्के लाभांश, उत्पादकांना 70 पैसे बोनस : मंगेश चव्हाण.विविध रंगांतील झिरमिळ्या व तीन सजावट साहित्यात मागे किंवा जमिनीवर लावण्यात येणारे आणि गवतासारखे दिसणारे प्लास्टिकचे लॉन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. बाप्पाची सजावट अधिक आकर्षक आणि अधिक भरीव दिसावी, यासाठी विविध रंगातील झिरमिळ्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. क्रिस्टल, लाकडी, रेशिम सजावटीसाठी उपलब्ध आहे. विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आवडी नूसार मखरांसाठी लागणारी फूलांची कमान देखील बनऊन देत आहे.विविध वस्तूंचे दर वाढल्याने नागरिकांची ओढाताण होताना दिसत आहे. व्यापाऱ्यांनाही व्यवसाय वाढीची प्रतीक्षा आहे. अलीकडील ऑनलाइन मार्केटिंगचे प्रस्थ वाढले आहे. तरुणाईचा अधिकतम ऑनलाइन खरेदीवरच जोर असतो. यातून व्यावसायिक स्पर्धा वाढली आहे. याला टक्कर देण्यासाठी येथील व्यावसायिक गणेश चतुर्थी कालावधीत खास सवलत योजना आखत आहेत. गणेश भक्तांनी स्थानिक बाजारपेठेमधूनच खरेदी करावी, असे आवाहनही होत आहे."सध्या ऑनलाइन मार्केटिंगचे प्रमाण वाढले आहे. तरुणाईचा ऑनलाइन खरेदीवरच जोर असतो. यातून व्यावसायिक स्पर्धा वाढली आहे. याला टक्कर देण्यासाठी गणेश चतुर्थी कालावधीत खास सवलत योजना आखली आहे. त्यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे." - रवी पंजवानी, व्यावसायिक, भुसावळ.तब्बल १३ लाख वीज ग्राहकांना पेपरलेस बिल, ‘एसएमएस’वर मिळते माहिती, मोबाइल क्रमांक, ई-मेल नोंदवण्याचे आवाहन .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.