अमळनेर : नातेवाईकांच्या चुकीच्या सांगण्यामुळे एकमेकांपासून पाच वर्षे लांब गेलेले दोन जोडपे लोकअदालतीमुळे पुन्हा सुखाने नांदायला तयार झाले. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत १ हजार २१२ प्रलंबित खटल्यापैकी १०६ खटले निकाली निघाले. एकूण १ कोटी ८९ लाख ७४ हजार ३५१ रुपयांची वसुली करण्यात आली. (106 cases decided in people court at Amalner)
दरम्यान, २ हजार ३७३ वादपूर्व खटल्यांपैकी ३१ खटले निकाली निघाले. त्यात ३० लाख ९७ हजार २५० रुपयांची वसुली झाली. मात्र, नगरपालिकेच्या ९६ थकबाकीदारांना वाटाघाटी करण्यासाठी लोकअदालतीत बोलावण्यात आले होते.
नगरपालिका एक पाऊल देखील मागे सरकायला तयार नव्हती म्हणून तडजोड होऊ शकली नाही. तडजोड करायची नव्हती तर नगरपालिकेने हे खटले लोकअदालतीत ठेवण्यास संमती का दिली, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी केला आहे. (latest marathi news)
थकबाकीदारांना फक्त न्यायालयाचा धाक दाखवून तडजोडीसाठी बोलावले. मात्र पालिकेने तडजोडीची भूमिकाच घेतली नाही. दरम्यान, कौटुंबिक खटल्यात तडजोड करत असताना एका नवऱ्याला आपण नातेवाईकांच्या सांगण्यावरून पत्नीशी वाद घातल्याचा पश्चाताप झाला.
त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर एका पत्नीने देखील नातेवाईकांनी कान भरल्यामुळे आमच्यात गैरसमज झाले, असे कबूल करून तिलाही रडू कोसळले. मात्र लोकअदालतीत तडजोड होऊन दोन्ही दाम्पत्यांनी सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या डोळ्यात आंनदाश्रू आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.