Jalgaon News : जिल्हयात आजपासून दहावीची परिक्षा सुरू झाली. पहिला पेपर दहावीचा होता. पहिल्याच दिवशी यावल येथील केंद्र झाकिर हुसेन माध्यमिक विद्यालयात एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला त्यावर कारवाई करण्यात आली. सामनेर (ता.पाचोरा) येथील परीक्षा केंद्रात मास (सामूहिक) कॉपी करण्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सामनेर परीक्षा केंद्र संचालकांना केंद्राची मान्यता का रद्द करू नये ? अशा आशयाची नोटीस बजावली आहे. (Jalgaon Mass copying took place in examination center at Sammanar)
शहरासह जिल्हयात आज दहावीची परिक्षा सुरू झाली. पहिला पेपर मराठीचा होता. सर्वच केंद्रावर परिक्षार्थीसही पालकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेदहालाच विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात सोडण्यात आले.
पहिला मराठीचा पेपर असल्याने काही ठिकाणी कॉप्या सूरू होत्या. काही ठिकाणी शांततेत परिक्षा झाली. आजच्या पेपरला जिल्ह्यात एकूण ४९ हजार ७०४ विद्यार्थी उपस्थित होते. ८७७ विद्यार्थी गैरहजर हजर होते. (latest marathi news)
सामनेर (ता.पाचोरा) परिक्षा केंद्रावर सामुहिक कॉपी झाल्याचा प्रकार घडल्याने, परिक्षा केंद्र संचालकांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस देवून केंद्राची मान्यता का रद्द करू नये अशा आशयाची नोटीस दिली आहे.
परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त वाढवावा, कॉपी मुक्त शंभर टक्के यशस्वी करावे असे नोटिशीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.