चाळीसगाव : येथील नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृतीपर गायिलेल्या ‘चला हो मतदान करू चला..’ या गीताचे खुद्द निवडणूक आयोगाचे सुक्ष्म निरीक्षक कुमार चंदन यांनी कौतुक केले तर हे गीत विवाह समारंभांमध्ये देखील गेले पाहिजे, अशी भावना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. (Jalgaon Lok Sabha Election)
त्याचा धागा पकडून उडत्या चालीवर व खानदेशी शैलीत गाण्याच्या रुपात छोटाशा प्रयत्नाला यश आल्याचे श्री. धनराळे यांनी सांगितले. निवडणुकीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षक कुमार चंदन यांनी चाळीसगाव येथे नुकतीच भेट दिली. या वेळी निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला.
त्यासह नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांचे मतदार जनजागृतीपर गीत प्रत्यक्षात ऐकले व सर्वांसमोर सादर करायला लावले. गीत क्रीनवर पाहून श्री. धनराळे यांचे विशेष अभिनंदन केले व हा व्हिडिओ- ऑडिओ पाठविण्याच्या सूचना दिल्या, हे विशेष. श्री.धनराळे यांनी गायिलेले हे गीत ‘यू-ट्यूब’सह प्रसार माध्यमांवर अपलोड करताच आठवडाभरात ४ हजार ७५५ व्ह्यूज, २६७ लाईक्स मिळाल्या असून, अनेक सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत. (Latest Marathi News)
हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात विवाह सोहळ्यातील मांडव, हळदी समारंभ व विवाह सोहळ्यात वाजवून मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमांतर्गत या गीतांचा बोलबाला दिसून येते आहे. खेड्यापाड्यात या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, यातून मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
"राष्ट्रीय कार्याची आनंद बाग बहरली व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न, या उद्देश साध्य होईल व निश्चितच वाढेल." - जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार, चाळीसगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.