जळगाव : 'तापमानवाढीने' हवामान विभागातर्फे अलर्ट

४५ अंशाचा टप्पा पार : बाहेर निघताना काळजी घेण्याचे आवाहन
Weather update rising heat, Jalgaon Weather Updates
Weather update rising heat, Jalgaon Weather Updatessakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची लाट जिल्ह्यात कायम आहे. यामुळे मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाटेची असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा, विशेषतः शेतात राबणारे कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. (Jalgaon Weather Updates)

प्रत्येक तालुक्‍यातील संबंधित यंत्रणा आरोग्य विभाग, महापालिका, सर्व ग्रामपंचायत कार्यालयांनी उष्माघाताने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, दक्षता व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विवाह, धार्मिक व सामाजिक मेळावे, शालेय व महाविद्यालय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, समारंभात आयोजक व प्रायोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आयोजनस्थळी सावलीसाठी ग्रीन शेड, मंडप, मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. रेल्वे, बसस्थानक, बाजार परिसर, मंगल कार्यालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पाणपोई, सावलीसाठी ग्रीन शेड तसेच आरोग्य विभागाद्वारे सुसज्ज उष्माघात कक्ष स्थापन करावेत. जेणेकरून उप्माघातांमुळे होणारी जीवितहानी टाळता येणे शक्‍य होईल.

अशी घ्या काळजी

  • तहान लागलेली नसली तरी पाणी प्या

  • हलके, पातळ, सुती कपडे वापरा

  • बाहेर जातांना गॉगल, छत्रीचा वापर करा

  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा

  • ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाका

  • ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, ताक प्या

  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका येण्याची चिन्हे आहेत.

  • चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • जनावरांना छावणीत ठेवा. त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्या

  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा

  • रात्री खिडक्या उघड्या ठेवा

  • थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करा

  • सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळा

  • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करा

  • गरोदर महिला, कामगार, आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.