भुसावळ : येथे कार्यरत असलेले लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय जळगाव येथे स्थलांतरीत करण्याचे अधिकक्ष अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडल, जळगाव यांचे आदेश होते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता भाजपचे ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंगेश सुभाष पाटील यांनी वरिष्ठांकडे कागदोपत्री पाठपुरावा करून हे कार्यालयाच्या स्थलांतराला स्थगिती मिळवली आहे. (Migration of small irrigation office in Bhusawal stopped)