Jalgaon Milk Union Election : तरीही संजय पवार भाजप- शिंदे गटात

Jalgaon Milk Union Election
Jalgaon Milk Union Electionesakal
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातील उमेदवारीवर पॅनलमधून लढण्याबाबत चांगलाच ड्रामा झाला. यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही फोनद्वारे एन्ट्री झाली. मात्र, संजय पवार राष्ट्रवादीप्रणीत महाविकास पॅनलमध्ये न राहता भाजपप्रणीत शिंदे-भाजप पॅनलकडूनच लढण्यासाठी ठाम राहिले. (Jalgaon Milk Union Election Sanjay Pawar in BJP Shinde group jalgaon news)

धरणगाव तालुका मतदारसंघात संजय पवार यांच्याविरुद्ध वाल्मीक पाटील यांची उमेदवारी आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी कॉंगेसचे आहेत. मात्र, संजय पवार यांनी भाजप-शिंदे गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. पॅनल होण्याअगोदरपासून संजय पवार भाजप-शिंदे गटाच्या पॅनलमध्ये आहेत. ते या पॅनलच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहिले. मात्र, सोमवारी (ता. २८) माघारीच्या अंतिम दिवशी ते राष्ट्रवादी कॉंगेसचे असल्यामुळे महाविकास आघाडी पॅनलमध्ये येत असल्यास धरणगाव गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वाल्मीक पाटील माघार घेतील व संजय पवार महाविकास आघाही पॅनलकडून बिनविरोध निवडून येतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा होती.

त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना पक्षाच्या नेत्यांनी फोन लावला. त्यानुसार अजित पवार संजय पवारांशी बोलण्यास तयार झाले. अजित पवारांनी थेट संजय पवार यांना फोन लावला. त्यानुसार दोघांमध्ये चर्चा झाली. अजित पवारांच्या आदेशानुसार चर्चा करण्यासाठी संजय पवार थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चर्चेला पोचले. त्यांच्या पॅनलमधील प्रवेशाबाबत पत्रकार परिषद घेण्याचे निश्‍चित झाले. मात्र, बंद दाराआड चर्चा सुरू असताना, संजय पवार त्या ठिकाणाहून निघून आले.

आपण शिंदे-भाजप पॅनलला शब्द दिला आहे. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपल्या रक्तात आजही शरद पवार, अजित पवार आहेत. मात्र, सहकारात पक्ष नसतो. त्यामुळे आपण राष्ट्रवादीत आहोत. मात्र, निवडणूक शिंदे-भाजप पॅनलकडून लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आणि थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अजिंठा विश्रामगृहात दाखल झाले.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Jalgaon Milk Union Election
Jalgaon Political News | मला कोणीही राष्ट्रवादी शिकवू नये : संजय पवार

दरम्यान, संजय पवार यांनीच आपल्याला बिनविरोध करावा, असा प्रस्ताव दिला होता. वाल्मीक पाटील यांनी अगोदर माघार घ्यावी. त्यांनतर आपण महाविकास आघाडीत असल्याची घोषणा करू. अगोदर तुम्ही महाविकास आघाडीत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करा, त्यानंतर माघार घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र ते काहीही न सांगता निघून गेले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले.

आमदार पाटलांची खेळी अन्‌ वाघ भाजप पॅनलमध्ये

निवडणूक कार्यालयातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या शिंदे-भाजप पॅनलमध्ये प्रवेशासाठी बिनविरोधची खेळी सुरू होती. पाचोरा मतदारसंघात शिंदे भाजप गटाचे किशोर पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांचे अर्ज होते. माजी आमदार दिलीप वाघ यांनी शिंदे भाजप गटात येण्याची तयारी दाखविल्यास आमदार किशोर पाटील यांनी माघार घेण्याची तयारी दाखविली होती. दिलीप वाघ पाचोरा तालुक्यात एका नातेवाइकाच्या लग्नात होते.

आमदार पाटील माघारीसाठी निवडणूक कार्यालयात हजर झाले होते. मात्र केवळ वाघ यांचा होकार आवश्‍यक होता. पाटील यांनी संपर्क सुरूच ठेवला. माघार घेण्याच्या अंतिम वेळीत बरोबर दुपारी तीनला पाच ते दहा मिनिटे शिल्लक असताना, दिलीप वाघ यांचा संपर्क झाला. त्यांनी तयारी दर्शविली अन्‌ किशोर पाटील यांची माघार घेतली व दिलीप वाघ बिनविरोध झाले. मात्र, ते शिंदे -भाजप पॅनलकडून झाले आहेत. असे त्यांनी तेथेच पत्रकारांना सांगितले. त्यानंतर दिलीप वाघ यांचीही व्हीडीओ क्लीप प्रसारित झाली.

Jalgaon Milk Union Election
Jalgaon News : अखेर रस्त्यांची कामे सुरू, आता खंड नको!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()