Jalgaon Milk Union Fraud Case : अखाद्य तुपातून राजमलाई चॉकलेट; 15 किलोचे 6 डबे जप्त

Jalgaon Milk Union Fraud Case
Jalgaon Milk Union Fraud Caseesakal
Updated on

जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघातील अपहारप्रकरणात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत शहर पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. एकाला अगोदरच जामीन झाला आहे. अटकेतील अग्रवाल यांच्याकडून अखाद्य तुपाचा वापर लहानमुलांमध्ये प्रसिद्ध राजमलाई नावाच्या चॉकलेट मध्ये चॉकलेट बेस म्हणून विकण्यासाठी केला जात होता. चॉकलेट निर्मितीसाठी अखाद्य तुपाचा वापर होत असल्याचे दूधसंघाच्या प्रकरणातून उघडकीस आले असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासनाने मात्र याबाबत अजूनही पुढाकार घेतलेला नाही की त्यांनीही झोपेचे सोंग घेतले आहे याची जनतेला उत्सुकता आहे. (Jalgaon Milk Union Fraud Case Rajmalai Chocolate made from Non Edible Ghee 6 containers of 15 kg seized jalgaon news)

दूध संघाच्या अपहारात अटकेतील संशयित आरोपी रवी मंदनलाल अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेट ब्रॅण्डने चॉकलेट उद्योग चालवत आहे. विठ्ठल रुक्मिणी एजन्सीच्या माध्यमातून दूधसंघातून मिळवलेले अखाद्य तूप खरेदी करत होते. Not For Human Use (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना माहिती असूनही मानवी आरेाग्यास धोका संभवणारे तूप त्यांनी खरेदी करून त्यातून राजमलाई या ब्रॅण्डची चॉकलेट निर्मिती करून ती अख्ख्या महाराष्ट्रात विकली.

कार्यकारी अधिकारी तथा संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल यांना याबाबत कल्पना होती. असे असताना अटकेतील संशयितांनी जाणीवपूर्वक खाण्यास अयोग्य अशा तूपातून बनविलेली चॉकलेट उत्पादन आणि विक्रीस प्रोत्साहन देऊन राज्यातील गोरगरीब चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात आणल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्याच अनुषंगाने पोलिस आता या प्रकरणात सखोल तपासात गुंतले आहेत. दूधसंघाच्या या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांना जेलवारी संभवते असेही बोलले जात आहे.

तपासातील लेखा-जोखा

कोणतीही पावती दिली जात नव्हती, नातेवाईकामार्फत मिळत असलेले टेंडरही रडारवर आहे. संशयित आरोपी रवी अग्रवाल हा हरी पाटील यांच्याकडून घेत असलेल्या अखाद्य (बी ग्रेड) तूपाबाबतची पूर्ण कल्पना असताना मोठया प्रमाणात या अखाद्य तुपाची खरेदी करत होता. त्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नव्हती. ती का दिली जात नव्हती?, या मागचे कारण काय व हे करण्यास कोण भाग पाडत होते? याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

Jalgaon Milk Union Fraud Case
Nashik : हिंगलाजनगर भागात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या तपासाचे आव्हान!

प्रमुख सुत्रधार चंद्रकात (सी.एम.) पाटील याचा नातेवाईक किशोर काशीनाथ पाटील याच्या नावावर विठ्ठल रुक्मिणी एजन्सी चालवली जात होती. ही एजन्सी घेण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश काय? चंद्रकांत मोतीराम पाटील प्रशासक मंडळाच्या महत्वाच्या पदावर असताना त्यांना असे, गैरकृत्य करण्यास कोणी प्रवृत्त केले किंवा आदेशित केले यासह त्याचे साथीदार कोण आहेत?, याचा शोध घ्यावयाचा आहे.

कमिशनवरील बोके

कार्यकारी अधीकारी मनोज लिमये जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात जबाबदार अधिकारी असतानाही एका साथीदाराच्या मदतीने त्यांनी बिलिंगच्या दस्ताऐवजमध्ये फेरफार करून बनावटी दस्तऐवज तयार केले आहेत. संशयित आरोपी निखील नेहते यांना जामिन मिळण्यासाठी सहकार्य केले असून याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध सुरु आहे. इतकेच नव्हे तर, संशयिताच्या जामिनासाठी लिमये यांनी प्रयत्न केल्याचे आढळून आले. लिमये आणि पाटील या सर्व झोलझालमध्ये कमीशन मारत असल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

सहा डबे तूप जप्त

अटकेतील संशयित अनिल अग्रवाल याने दूध फेडरेशनमधून घेतलेल्या अखाद्य तुपाबाबत कबुली देत निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर परीसरातून हे तुपाचे डबे जप्त करण्यात आले. तपासाधिकारी उपअधीक्षक संदिप गावित त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र पाटील, ओम सोनी यांनी रितसर पंचनामा करुन तूप जप्त केले असून तपासणीसाठी प्रयेागशाळेत पाठवले जाणार आहे.

Jalgaon Milk Union Fraud Case
Chhagan Bhujbal | नाशिकमधील सिडको कार्यालय हलविण्याचा हेतू नेमका काय?; भुजबळांचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.