Jalgaon Milk Union Fraud : मुंडेसह पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस; न्यायालयाचा अवमान प्रकरण

District Milk Union fraud News
District Milk Union fraud Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघातील लोणी व दूध पावडर चोरी प्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी तक्रार दिली असता, पोलिसांनी ती दाखल करून घेतली नाही. त्यानंतर लिमये यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तक्रार दाखल करून न घेतल्याबद्दल गुरुवारी (ता. ८) न्यायालयाने तत्कालीन पोलिस अधीक्षक मुंडे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयचा अवमान केल्याप्रकरणी आपल्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली असल्याची माहिती ॲड. अतुल सूर्यवंशी यांनी दिली. (Jalgaon Milk Union Fraud Notice to police officers including Munde Contempt of Court Case jalgaon News)

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

District Milk Union fraud News
Election 2022 : जिल्हा दूध संघ निवडणूकीचा सुरू झालायं ‘माईंड गेम’

जिल्हा दूध संघातील लोणी व दूध पावडर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी आमदार एकनाथ खडसे, चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी शहर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तरीही पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यानंतर कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावा, अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने १७ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली होती. मात्र, त्या अगोदर पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन रात्री तीन वाजून १५ मिनिटांनी दूध संघ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बाबी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यातर्फे न्यायालयात वकीलांनी लक्षात आणून दिल्या. या प्रकरणात आपण तक्रारदार असतानाही पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन चुकीची फिर्याद दाखल केली, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी न्यायालयाने १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश पारित केले. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर मनोज लिमये यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली.

या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने गुरुवारी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपसिंग परदेशी, निरीक्षक विजयकुमार ठाकूरवार, तत्कालीन पोलिस अधीक्षक मुंडे, तकालीन तपासी अधिकारी राजकुमार चिंथा यांना आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावली आहे. ॲड. अतुल सुर्यवंशी यांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची बाजू मांडली.

District Milk Union fraud News
Jalgaon News: अरे बापरे! जळगावच्या कचरा डेपोत साचलाय 3 लाख क्यूबिक टन कचरा; निधी असूनही प्रशासनाची दिरंगाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.