जळगाव : विश्वास संपादन करून व्यापाऱ्याला लाखोंचा चुना

दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल
विश्वास संपादन करून व्यापाऱ्याला लाखोंचा चुना
विश्वास संपादन करून व्यापाऱ्याला लाखोंचा चुनाsakal
Updated on

जळगाव : जळगावसहीत इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी घेऊन सुमारे ६० लाख २२ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील डेमला कॉलनीतील रहिवासी महेंद्र ललवाणी यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, नीलेश पाटील व दिनेश पाटील या दोघांनी २०१३ मध्ये श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले होते.

हे दोघ ललवाणी यांच्याकडून होलसेल दराने इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेऊन जात होते. त्यांनी ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेउन रोख व उधारीने घेऊन जात होते. काही वेळा रोख तर काही वेळा उधारीने वस्तू घेऊन जात असल्याने त्यांनी ललवाणी यांचा विश्‍वास संपादन केला. अनेक वर्षाचे जुने ग्राहक म्हणून झालेल्या उधारीत त्यांच्याकडे सुमारे ११ लाख ८६ हजार ७३ रुपये बाकी आहेत. त्यांना बाकी असलेल्या पैशांसाठी फोन करून व त्यांच्या घरी जाऊन मागणी केली असता, त्यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती.

अनेकांना चुना.

महेंद्र ललवाणी यांनी नीलेश व दिनेश पाटील या दोघांबद्दल मार्केटमध्ये विचारपूस केली असता, त्यांना अनेक व्यापाऱ्यांचे त्यांच्याकडे पैसे घेणे असल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. त्यामुळे ललवाणी यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांना दोघांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. भुसावळ, धुळे, पुणे आणि जळगावातील काही व्यापाऱ्यांना एकूण ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी महेंद्र ललवाणी यांनी ११ एप्रिल रोजी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नीलेश पाटील व दिनेश पाटील (दोघ रा. प्लॉट नंबर १२ भुरेमामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) या दोघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.