Anil Patil News : मतदार संघात डॉ संभाजीराजे पाटील यांच्या रूपाने नवीन चेहरा : मंत्री अनिल पाटील

पारोळा ः प्रवेश मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ना. अनिल पाटील व्यासपीठावर डॉक्टर संभाजीराजे पाटील , माजी आमदार दिलीप वाघ,
Minister Anil Patil
Minister Anil Patil esakal
Updated on

Anil Patil News : अनेक वर्षापासून पारोळा तालुक्यात आलटून पालटूनचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे कठीण झाले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉ संभाजीराजे पाटील हा नवा चेहरा मतदारांसमोर दिला असून एरंडोल मतदारसंघात गाव तेथे राष्ट्रवादी हे ध्येय डोळ्यासमोर डॉ. पाटील यांनी जबाबदारी सांभाळावी. असे आवाहान मंत्री अनिल पाटील यांनी केले. (jalgaon Minister Anil Patil statement new face in constituency in form of Dr Sambhaji Raje Patil marathi news )

पारोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे डॉ संभाजीराजे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. डॉ. पाटील यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, अमित पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अभिलाषा रोकडे, योगेश देसले, अरविंद मानकरी, सविता भोसले, भूषण भदाणे, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष रिटा बाविस्कर, महेश पवार, कुशल देशमुख, किशोर पाटील , प्रा सुरेश पाटील, एल टी पाटील ,सुनील काटे शत्रुघ्न पाटील, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील यांनी फटकेबाजी

मंत्री पाटील म्हणाले की, वैद्यकीय व्यवसाय बरोबर पक्षाच्या माध्यमातून डॉ. संभाजी पाटील यांनी मतदार संघात गरजूंची कामे करावी. कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा पाईक असून येणाऱ्या काळात समन्वय समिती स्थापन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करावे. (latest marathi news)

Minister Anil Patil
Minister Anil Patil : टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी, चाऱ्याची व्यवस्था करा : मंत्री अनिल पाटील

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाला तिकीट मिळावे अशी आग्रही भूमिका असल्याचे सांगितले. तसेच एरंडोल मतदारसंघात कार्यकर्त्यांनी डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी मजबूतीने उभे रहावे असे आवाहान केले.

पारंपारिक राजकारणाला छेद

''मतदार संघात पारंपारिक पद्धतीने आलटून पालटून राजकारण सुरू आहे. त्याला छेद देण्यासाठी आपण वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला असून पक्षाने संधी दिलास तिचे सोनं करत मतदार संघातील गरजू प्रश्नांना न्याय देत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्याचा प्रयत्न करू. मतदारसंघात ३ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामान्यांना दिलासा दिला आहे.''- डॉ संभाजीराजे पाटील

Minister Anil Patil
Anil Patil News : शेतकऱ्यांच्या पदरात अधिकाधिक नुकसानभरपाई : पालकमंत्री अनिल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.