Jalgaon News : ‘मुक्त’ने विदेशी भाषांचे शिक्षणक्रम सुरू करावे : मंत्री चंद्रकांत पाटील

Jalgaon News : अमळनेर येथील उपकेंद्रामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व २५० च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे.
Minister Chandrakant Patil, Minister Anil Patil, Collector Ayush Prasad, Rajesh Pandey, CA Neeraj Agarwal etc. were present during the Bhumi Puja of the sub-centre building at Amalner.
Minister Chandrakant Patil, Minister Anil Patil, Collector Ayush Prasad, Rajesh Pandey, CA Neeraj Agarwal etc. were present during the Bhumi Puja of the sub-centre building at Amalner.esakal
Updated on

अमळनेर : आपल्याला जगातील किमान दहा भाषा येणे गरजेचे आहे. यासाठी मुक्त विद्यापीठाने काळाची गरज लक्षात घेऊन विदेशी भाषांचे शिक्षणक्रम सुरू करावे. यामुळे आपल्या तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. (Minister Chandrakant Patil statement regarding YCMOU)

मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे अध्यक्षस्थानी होते. मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सदस्य राजेश पांडे मंचावर उपस्थित होते.

श्री. पाटील पुम्हणाले, ‘मुक्त विद्यापीठाने सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सुरू करावे. उपकेंद्राची इमारत तयार होण्यास काही अवधी लागेल, तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात अमळनेर येथे इतर ठिकाणी केंद्र सुरू करावे. अशाच प्रकारचे उपकेंद्र मुक्त विद्यापीठ राज्यात इतर ठिकाणी देखील सुरू करणार आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती करण्यास शासन सदैव विद्यापीठासोबत राहील.

मंत्री अनिल पाटील, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राजेश पांडे यांची भाषणे झाली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले. मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विभागीय संचालक डॉ. प्रमोद रसाळ, कार्यकारी अभियंता राजेश भावसार, सीए नीरज अग्रवाल, प्रा. किशोर पाटील, किरण हिरे, कैलास मोरे, डॉ. मधुकर शेवाळे, सुनील निकम, तसेच येथील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (latest marathi news)

Minister Chandrakant Patil, Minister Anil Patil, Collector Ayush Prasad, Rajesh Pandey, CA Neeraj Agarwal etc. were present during the Bhumi Puja of the sub-centre building at Amalner.
Vinesh Phogat disqualified: १०० ग्रॅम वजनाने 'सुवर्ण' स्वप्नभंग! विनेशला अपात्र ठरवणारा ऑलिम्पिकचा नियम आहे तरी काय?

२५० वर प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रम

अमळनेर येथील उपकेंद्रामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व २५० च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार उच्च शिक्षण, त्याबरोबरच जीवनात उपयोगी ठरणारे प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्स, कृषीविषयक तंत्रज्ञानाची माहिती व कौशल्यावर आधारित शिक्षण, दूरस्थ शिक्षणाबरोबरच ऑनलाइन शिक्षण, तसेच संशोधन व स्टार्ट अप प्रोत्साहन व गुणात्मक, संख्यात्मक वाढ शाश्वत विकासासाठी विद्यापीठाला विस्तार करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर येथे उपकेंद्र सुरू करण्यात येत आहे.

Minister Chandrakant Patil, Minister Anil Patil, Collector Ayush Prasad, Rajesh Pandey, CA Neeraj Agarwal etc. were present during the Bhumi Puja of the sub-centre building at Amalner.
Jalgaon: तामसवाडी, भोकरबारी प्रकल्पांत ठणठणात! धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.