Girish Mahajan : देशात नसेल अशी ‘डेक्कन ओडिसी’ सुरू करणार : मंत्री गिरीश महाजन

Girish Mahajan : पर्यटन आता उद्योगाचे रूप घेत आहे. देशातील सर्वच राज्यांचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे.
Tourism Minister Girish Mahajan himself enjoying speed boating during the three-day water tourism festival at Mehrun Lake.
Tourism Minister Girish Mahajan himself enjoying speed boating during the three-day water tourism festival at Mehrun Lake.esakal
Updated on

जळगाव : पर्यटन आता उद्योगाचे रूप घेत आहे. देशातील सर्वच राज्यांचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. त्याअंतर्गत राज्यातच नव्हे; तर संपूर्ण देशात नसेल अशी ‘डेक्कन ओडिसी’ सुरू करणार आहे. यात २४ तास राहण्याच्या सर्व सोयी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामीण विकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. २) जळगावात दिली. जळगावातील मेहरूण तलावावर बुधवारपासून सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या जलपर्यटन महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. (Minister Girish Mahajan statement of Deccan odyssey like no other in country will be started )

खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले, की राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. राज्यात किल्ले, जलस्रोत, लेणी, वन मुबलक प्रमाणात आहे. (latest maratahi news)

Tourism Minister Girish Mahajan himself enjoying speed boating during the three-day water tourism festival at Mehrun Lake.
​Girish Mahajan : शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात लवकरच तोडगा ;गिरीश महाजन

आपल्या राज्याला ७५० किलोमीटर एवढी मोठी समुद्र किनारपट्टी आहे. इथल्या पर्यटनात मोठी क्षमता असून, जगभराचे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील यासाठी सिंधुदुर्गाजवळ स्कूबा डायव्हिंगचा प्रकल्प सुरू केला आहे. समुद्राच्या आतमध्ये जाऊन तिथले जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी, मासे, वनस्पती पाहायला मिळतील. आजपर्यंत इथे परदेशी पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल नव्हते. ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचा प्रारंभ होणार आहे.

Tourism Minister Girish Mahajan himself enjoying speed boating during the three-day water tourism festival at Mehrun Lake.
Girish Mahajan News: मतदारांनी जाब विचारला, महाजनांनी पळ काढला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.