Jalgaon News : ग्रामविकास विभागात राज्यात 19 हजार पदांची भरती : मंत्री गिरीश महाजन

Jalgaon : राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात १९ हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतली असून, या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
Guardian Minister Gulabrao Patil, Minister Anil Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy.
Guardian Minister Gulabrao Patil, Minister Anil Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy.esakal
Updated on

Jalgaon News : राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात १९ हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतली असून, या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही सोपी बाब नाही. मात्र, असे असतानाही अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन उमेदवारांना गुरुवारी (ता. २५) नियुक्तीपत्र दिले जात आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ()

आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वात संपादन करा, जनतेची मने जिंका, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवारी महाभरती २०२३-२४ अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप व जळगाव पर्यटन चित्रफितीच्या लोकार्पण झाले. त्यावेळी मंत्रीद्वयी बोलत होते.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे, प्रशिक्षणातील सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलू केजो, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil, Minister Anil Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy.
Jalgaon News : फाफोरा येथील बोरी नदीवरील बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता!

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त ७५ हजारांपेक्षा अधिक तरुणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, त्या दृष्टीने शासन सर्व पातळीवर उपाययोजना करीत आहे, असे सांगत श्री. महाजन यांनी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. आपण सगळे आपल्या गुणात्मक कौशल्याच्या जोरावर शासकीय नोकरीत आला, हीच या शासनाची पारदर्शकता आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून आपली प्रतिमा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात आपण ती कराल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

या विभागात नियुक्तीपत्र

नवनियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यात तलाठी १९५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ३५, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक ३२, औषध निर्माण अधिकारी १०, कनिष्ठ सहाय्यक ३५ व शिक्षणसेवक ११४ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविकातून नवनियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्त दिल्या असून, न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनात आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्यामुळे प्रशासनाला गतिमानता येणार असल्याचे नमूद केले.

श्री. प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार व महसूल प्रशासनाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांचे अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यातील २१ पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या चित्रफितींचे लोकार्पण करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत भूषणावह असून, पर्यटनावर आधारित चित्रफित तयार करणारा जळगाव जिल्हा पहिलाच असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आभार मानले. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार ३१ जुलैला निवृत्त होत असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Guardian Minister Gulabrao Patil, Minister Anil Patil, MLA Suresh Bhole, Collector Ayush Prasad, G.P. CEO Ankit, Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy.
Jalgaon News : योगशास्त्र विभागातर्फे पदवी, पदविका अभ्यासक्रम! NMUत प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.