Jalgaon News : RTO कार्यालय भडगावलाच होईल : आमदार किशोर पाटील

Latest Marathi News : जळगावच्या ‘आरटीओ’ कार्यालयीवरील कामकाजाचा भार पाहता, या कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन कार्यालय भडगाव येथे प्रस्तावित आहे
MLA Kishor Patil
MLA Kishor Patilesakal
Updated on

भडगाव : जळगावच्या ‘आरटीओ’ कार्यालयीवरील कामकाजाचा भार पाहता, या कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन कार्यालय भडगाव येथे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनदरबारी अंतिम टप्प्यात आहे.

चाळीसगाव येथे ‘आरटीओ’ कार्यालयाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भडगावलाच ‘आरटीओ’ कार्यालय होईल, यात शंका उपस्थित करण्याचे कारण नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार किशोर पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मांडली आहे. (Jalgaon RTO office Bhadgaon marathi news)

भडगावला ‘आरटीओ’ कार्यालय होण्यासाठी मी दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. भौगोलिकदृष्ट्या जळगावनंतर भडगाव हे इतर तालुक्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे परीवहन विभागाकडून भडगाव येथे कार्यालय प्रस्तावित केले असून तसा प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

केवळ योग्य जागेअभावी तो इतक्या दिवस रेंगाळला होता. दोन- तीन महिन्यापूर्वीच कोळगाव रस्त्यावरील व पाचोरा रस्त्यावरील शासकीय ‘आयटीआय’ समोरील जागेची चाचपणी करण्यात आली होती. यापैकी कुठली तरी एक जागा ‘आरटीओ’ कार्यालयासाठी निश्चित केली जाईल. चाळीसगावचा प्रस्तावच शासनाकडे अजूनपर्यंत गेलेला नाही.

MLA Kishor Patil
Jalgaon Crime : श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचा परवाना निलंबित! कृषी विभागाची कारवाई

त्यामुळे तेथे मंजुरी कशी काय मिळेल? असा प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला आहे. हे कार्यालय चाळीसगावला केले तर पाचोरावासीयांना जळगाव इतकेच अंतर चाळीसगावसाठी लागणार आहे. भडगाव या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या प्रत्येक तालुक्याला अत्यंत सोयीचे ठिकाण आहे.

त्याअनुषंगाने परिवहन विभागाने भडगावच्या ‘आरटीओ’ कार्यालयासाठीचा प्रस्ताव पुढे केला आहे. कार्यालयाचे विभाजन हे लोकांच्या सोयीसाठी होणार आहे. त्यामुळेच ते भौगोलिकदृष्ट्या भडगावलाच योग्य होणार आहे. पुढच्या आठवड्यात स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भडगावच्या ‘आरटीओ’ कार्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी करणार आहे. हे कार्यालय कुठेही जाऊ देणार नाही असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

MLA Kishor Patil
Shiv Jayanti 2024 : मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.