Jalgaon News : जिल्ह्यात लोकसभेची राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात आता चाळीसगाव तालुका जोरदार राजकीय उष्मा आग ओकू लागला आहे. तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्यातील नेते एकनाथ खडसेंवर हल्ला चढविला होता. तर आता चाळीसगावातीलच खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपचे राज्यातील नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शाब्दिक अस्त्र उगारले आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)
भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर शाब्दीक हल्ला चढविला होता, त्यांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी आव्हान दिले होते. जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत तर खडसे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत त्यांनी थेट मुक्ताईनगर डेअरी संस्थेतून निवडणूक लढविली व खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पराभूत केले होते.
त्यानंतर जिल्हा दूध संघात आपले जास्त संचालक निवडून आणून खडसे यांच्या वर्चस्वाला धक्का देत जिल्हा दूध संघ ताब्यात घेतला आहे. त्यानंतरही त्यानी खडसेंवर शाब्दीक हल्ला सुरूच ठेवला होता. परंतु खडसे आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार हेच बघणे महत्वाचे ठरणार आहे.
खडसे व चव्हाण या दोन्ही नेत्यांचा वाद सुरू असतांनाच आता चाळीसगावातील माजी खासदार उन्मेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्ष सोडताच त्यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी जाहिररित्या पत्रकार परिषदेत केला आहे. (jalgaon political news)
एवढेच नव्हे; तर मंत्री म्हणूनही ते विकास करण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा बँक फोडाफोडी करून ताब्यात घेतली परंतु त्याच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आणि गटसचिवाचे प्रश्नही ते सोडवू शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावर टिका केली होती.
त्या टिकेला उत्तर देतांना पाटील म्हणाले की, गिरीश महाजन यांनी आता सांभाळून बोलावे अन्यथा आपण त्यांना जामनेरच्या बाहेर पडू देणार नाही. लोकसभा निवडणूकीच्या सुरूवातीलाच असे शाब्दिक हल्ले सुरू झाल्याने ऐन प्रचार काळात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असल्याचे दिसून येत आहे.
गिरीश महाजन यांच्यावर थेट हल्ला करणारे खडसे त्यांच्याच भाजपत येत आहेत, परंतु त्यांचा वाद अद्यापही थांबला नाही.परंतु आता पक्षाचेच माजी खासदार उन्मेश पाटील यांनी महाजन विरोधी हल्ला सुरू केला असून त्यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे महाजन आगामी काळात हा हल्ला कसा परतवून लावणार याकडेच लक्ष असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.