पाचोरा : येथील आमदार किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह पालिका प्रशासक मंगेश देवरे यांच्या दालनात जाऊन विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील रस्त्यांची दुरवस्था व नागरी सुविधांचा अभाव यासंदर्भात चांगलीच कानउघडणी केली.
नागरिकांच्या जीविताशी न खेळता जमेल तेवढ्या लवकर रस्त्यांची दुरुस्ती करून योग्य त्या नागरी सुविधा पुरविण्याचे आमदार किशोर पाटील यांनी पालिका प्रशासनाला आदेशित केले. (MLA open statment to municipal administration Action orders regarding road repair)
प्रशासक मंगेश देवरे यांच्या दालनात आमदार किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शरद पाटे, बाजार समिती सभापती गणेश पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रशासक मंगेश देवरे यांच्यासह पालिका प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार पाटील यांनी पालिकेबाबत प्राप्त तक्रारी संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील वसाहतीतील रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, घनकचरा, जन्म-मृत्यूचे दाखले, जंतुनाशकांची फवारणी, साफसफाई, स्वच्छता अशा विविध प्रश्नांसंदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आमदारांनी प्रशासक व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
अभियंता जितेंद्र मोरे यांना विविध कामांसंदर्भात माहिती विचारण्यात आली. घनकचरा विभागात १२३ कर्मचारी असून, ८० कामगार काम करतात. इतर कर्मचारी विविध विभागात कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील १०५ किमीपैकी २० किमी जलवाहिनीचे काम झाले असून, इतर काम सुरू असल्याचे सांगितल्यावर काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठ्याचे कसे नियोजन राहील? याबाबत आमदारांनी विचारणा केली. (latest marathi news)
साफसफाई केली जात नाही. गटारीतील सांडपाणी, घाण, किडे रस्त्यावर बाहेर येतात. व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य आहे. टॉयलेट अस्तित्वात नाहीत. झाडझूड केली जात नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोगराईची भीती असताना स्वच्छता व फवारणीकडे दुर्लक्ष करण्यामागचा हेतू काय? रोगराई पसरली तर त्याला जबाबदार कोण?
अशा पद्धतीची कानउघडणी करून पालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याने शहराच्या विविध भागात टप्प्याटप्प्याने भेटी देऊन लोकांच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात. समस्यांची पूर्तता करावी व नागरिकांना न्याय द्यावा, असे सुचित केले. तसेच रस्त्यांची दुरूस्ती व इतर नागरी सुविधा पुरविण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी; अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला.
नागरिकांमधून संतप्त भावना
दरम्यान, शहरातील विविध संस्था, संघटना, राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांकडून आतापर्यंत पालिकेकडे रस्ते व नागरी सुविधांबाबत अनेकदा निवेदन देण्यात आली आहेत. त्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. असुविधा ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.